बेळगाव : अनगोळ येथील एका युवकावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी कसाई खड्डा परिसरात ही घटना घडली आहे. यमनाप्पा पुजारी (वय 45, रा. अनगोळ) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यमनाप्पावर हल्ला करणार्या तरुणाचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात काहीकाळ धावपळ उडाली.
belgavkar
बुधवारी सायंकाळी यमनाप्पा कसाई खड्डा परिसरात बसला होता. दारूला पैसे नाहीत म्हणून मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून आलेल्या एका तरुणाबरोबर त्याची वादावादी झाली. वादावादीनंतर यमनाप्पावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. मार्केट पोलिसांना या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी यमनाप्पाला सिव्हिल हॉस्पिटलला हलविले. मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी पुढील तपास करीत आहेत.