college-student-records-semi-nude-videos-of-girls-on-hidden-cam-in-toilet-detained-karnataka-20221107.jpg | धक्कादायक...! मुलींच्या वसतीगृहातील स्वच्छतागृहात लावला कॅमेरा, अर्धनग्न व्हिडीओ काढल्याने खळबळ; आरोपी ताब्यात | belgaum news | belgavkar बेळगावकर

धक्कादायक...! मुलींच्या वसतीगृहातील स्वच्छतागृहात लावला कॅमेरा, अर्धनग्न व्हिडीओ काढल्याने खळबळ; आरोपी ताब्यात

belgavkar.com | belgaum | belgavkar

मुलींच्या वॉशरूममध्ये बसवला छुपा कॅमेरा; 1200 हून अधिक अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड

कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथील एका खासगी महाविद्यालयातील विद्यार्थ्याला मुलींचे अर्धनग्न व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. याबाबत पोलिसांनी सांगितलं की, विद्यार्थ्यावर वसतिगृहातील विद्यार्थिनींचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा बसवल्याचा आरोप आहे. तसंच त्यानं 1200 हून अधिक अर्धनग्न व्हिडिओ आणि मुलींचे फोटो रेकॉर्ड केले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव शुभम एम आझाद आहे. पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, शुभमनं त्याच्या मैत्रिणीचे अर्धनग्न फोटोही काढले केले होते. असा आरोपही त्याच्यावर करण्यात आलाय. काही मुलींनी त्याला वॉशरूममध्ये डोकावून पाहताना पकडल्यानंतर, तो हॉस्टेलमधून पळाला होता.
राजधानी बेंगळुरुतील होसाकेरेहल्लीजवळील एका खाजगी महाविद्यालयात घडलेली ही घटना अधिकार्‍यांनी वसतिगृहात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर उघडकीस आली. यापूर्वीही शुभमनं असंच कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं. लेखी माफीनामा सादर केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आलीय. पोलिसांनी सांगितलं की, महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या तक्रारीच्या आधारे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा फोन जप्त करण्यात आला आहे. शुभमच्या फोनमधून 1200 हून अधिक व्हिडिओ आणि फोटो जप्त केले आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकारी पी कृष्णकांत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, आरोपी हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. त्यानं हे घाणेरडं कृत्य केलंय. त्यामुळं आम्ही संबंधित कलमांखाली त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. तक्रारीच्या आधारे आम्ही तपास करत आहोत. या प्रकरणी आम्ही लवकरच गुन्हा दाखल करून तपास सुरू करणार आहोत.