hd-kumaraswamy-viral-video-in-kolar-srinivaspur-abuse-congress-former-speaker-k-r-ramesh-20221156.jpeg | माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींची काँग्रेस नेत्याला शिवीगाळ; आता म्हणाले... | belgaum news | belgavkar बेळगावकर

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींची काँग्रेस नेत्याला शिवीगाळ; आता म्हणाले...

belgavkar.com | belgaum | belgavkar

'हा रमेश कुमार निरर्थक भाषणं देत राहतो.... औलाद... काय

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल सेक्युलरचे (जेडीएस) नेते एचडी कुमारस्वामी कोलारच्या श्रीनिवासपुरा विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात कुमारस्वामी यांनी रागाच्या भरात अपशब्द वापरले. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. कोलारमधील श्रीनिवासपुरा येथील काँग्रेसचे आमदार आणि कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष केआर रमेश कुमार यांना एचडी कुमारस्वामी यांनी शिवीगाळ केली आहे. श्रीनिवासपुरातील एका शाळेला कुमारस्वामी यांनी भेट दिली. मात्र शाळेची अवस्था पाहून ते परतत होते. गाडीत बसलेले जेडीएस नेते कुमारस्वामी म्हणाले, 'हा रमेश कुमार निरर्थक भाषणं देत राहतो.... औलाद... काय शाळेची अवस्था. मुलं इथे शिकत आहेत.
एचडी कुमारस्वामी यांचे अपशब्द कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले. कुमारस्वामी यांना आपली चूक लक्षात आली. त्यानंतर आपल्या चुकीबद्दल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून खेद व्यक्त करत म्हटले की, कोणाच्या भावना दुखावणे हा उद्देश नव्हता.

'माजी सभापती रमेश कुमार यांच्याबद्दल मी जे बोललो त्यामुळे आता मलाही खेद आहे. अशा प्रकारची भाषा मला शोभत नाही. त्याबद्दल मी माफी मागतो. माझ्या बोलण्याने रमेश कुमार किंवा कुणी दुखावले असेल, तर मी ते शब्द मी मागे घेतो,' असे ते म्हणाले.