belgavkar
महात्मा फुले रोड बेळगाव येथील लेकव्ह्यू हॉस्पिटल समोर झालेल्या अपघातात टेम्पो चालक मुश्ताक किरकोळ जखमी झाला आहे. दुचाकीस्वाराला वाचवताना हा अपघात झाला आहे. मुश्ताकने आपल्या जीवाची पर्वा ना करता चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी आपली मालवाहतूक टेम्पो गाडी दुभाजकावर चढवली. व त्या दुचाकीस्वाराचा जीव वाचवला. पण दुचाकीस्वार तेथे न थांबता पळून गेला. या अपघातात मुश्ताकच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.
मुश्ताक आपली गाडी घेऊन गोवा वेस सर्कल येथून शिवाजी महाराज उद्यानकडे जात होता, तर दुचाकीस्वार चुकीच्या दिशेने हॉस्पिटलच्या समोरून आला व दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला.
या अपघातात टेम्पो गाडीचे नुकसान झाले आहे तसेच रस्त्यावरील इलेक्ट्रिक खांबाला गाडी जोरात धडकल्याने खांब्याचे हि नुकसान झाले आहे.