घाईघाईत ती रिक्षात AirPod विसरली, परत करण्यासाठी रिक्षावाल्यानं जे केलं ते पाहून लोक म्हणाले मानलं.....

घाईघाईत ती रिक्षात AirPod विसरली, परत करण्यासाठी रिक्षावाल्यानं जे केलं ते पाहून लोक म्हणाले मानलं.....

belgavkar.com | belgaum | belgavkar

एकदा हरवलेली वस्तू अनपेक्षितपणे पुन्हा सापडल्याच्या आनंदापेक्षा दुसरा आनंद कोणताच नसू शकतो. रोज  रिक्षा, बस, ट्रेननं प्रवास करताना अनेक वस्तू हरवतात ज्या कधीच परत सापडत नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या घटनेत एका तरूणीचे एअरपॉर्ड्स हरवले होते आणि रिक्षावाल्याच्या प्रयत्नांमुळे ते पुन्हा सापडले.  ट्विटर वापरकर्त्याने पोस्ट केलेल्या स्टोरीमध्ये कर्नाटकातील बेंगळुरूमधील ऑटो ड्रायव्हर आहे. पोस्टनुसार, कामावर जाताना शिदिका तिचे एअरपॉड्स ऑटोमध्ये चुकून विसरली होती. मात्र, अर्ध्या तासात तिचे महागडे गॅझेट परत मिळाल्याने तिला आश्चर्याचा धक्का बसला.
कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'ऑटोमध्ये प्रवास करताना माझे एअरपॉड्स हरवले. अर्ध्या तासानंतर, मला WeWork येथे सोडणारा हा ऑटोचालक गेटवर आला आणि त्याने ते परत सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हवाली केले. वरवर पाहता, त्याने मालकाचे नाव शोधण्यासाठी AirPods कनेक्ट केले आणि माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा PhonePe व्यवहाराचा वापर केला.''
ऑटो चालकाच्या प्रयत्नांनी लोक पूर्णपणे प्रभावित झाले आहेत. या घटनेने त्यांचा माणुसकीवरचा विश्वास आणखी कसा वाढला आहे हे शेअर करण्यासाठी लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी आपल्या हरवलेल्या वस्तू कशा सापडल्या त्याचे अनुभव  सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

घाईघाईत ती रिक्षात AirPod विसरली, परत करण्यासाठी रिक्षावाल्यानं जे केलं ते पाहून लोक म्हणाले मानलं.....

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm