belgavkar
टिळकवाडी येथील राष्ट्रीय धावपटू व बेळगावची कन्या शीतल पाटील-कोल्हापुरे हिची मलेशिया(पेनांग) येथे 7 ते 15 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या आशिया पॅसिफिक गेमसाठी निवड झाली आहे. टिळकवाडीतील बालिका आदर्श विद्यालय या मराठी शाळेत शिकलेल्या कन्येला व दोन मुलांच्या आईला आर्थिक मदतीची गरज आहे.
या स्पर्धेसाठी तिला तब्बल सव्वा लाखाचा खर्च अपेक्षित आहे व तो खर्च तीला पेलनारा नसल्यामुळे आर्थिक मदतीची गरज तिला भासणार आहे.
बेळगाव शहर व परिसरातील दानशूर व्यक्तींनी तिला मदत करावी हि belgavkar.कॉम व शीतलच्या वतीने विनंती...
देशातून एकूण 60 स्पर्धक या स्पर्धेत भाग घेत असून कर्नाटकातील ती एकमेव धावपटू आहे. ती सध्या एका खासगी शाळेमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्य करते. तर पती लेथ मशीनवर काम करतात.
या अगोदरही शीतलने अनेक स्पर्धेत भाग घेतला आहे व तिच्यावर सध्या लाखो रुपयाचे कर्ज तिच्यावर आहे.
इच्छुक दानशूरांनी खालील बँक खात्यात आपली रक्कम जमा करावी.
सारस्वत बँक, टिळकवाडी ब्रांच बेळगाव
खाते क्रमांक : 86200100004513 - बचत खाते
आयएफसी कोड : SRCB0000086
शीतलली या पुर्वीची यशस्वी कारकीर्द
2007 - न्यूझीलंड - वर्ल्ड मास्टर्स ऑलिम्पिक - 1500 व 1800 मीटर स्पर्धेत दोन सुवर्णपदक व 400 मीटर मध्ये कास्यपदक
2006 - श्रीलंका - बेस्ट इंडियन स्पोर्ट्स किताब
तर दरवर्षी म्हैसूर येथे होणाऱ्या स्पर्धेत ती चांगली कामगिरी करून पदक पटकवते.
आतापर्यंत शीतलला केलीली मदत
डॉक्टर पी. एस. मत्तिवडे निपाणी - 25000
पोलीहैड्रोन बेळगाव - 15000
फेसबुक फ्रेंड सर्कल - 5000
सागर हेगडे मित्र मंडळ - 5000
कीर्ती शिवकुमार मित्रपरिवार - 3000
के. सी. लक्ष्मीनारायण - 1000
स्पर्धेसाठी शीतलला दिनांक ३ सप्टेंबर रोजी रवाना व्हायचे आहे . सध्या तिने ५० हजार रुपये जमा केले आहेत. तर उरलेली रक्कम तिला १५ ऑगस्ट पर्यंत भरणे गरजेचे आहे.