belgaum-बेळगाव-belgaum-dinosaur-and-godzilla-in-fort-lake-area-belgavkar-belgaum-202211.jpg | बेळगाव : किल्ला तलाव परिसरात डायनासोर, गॉडझिला | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : किल्ला तलाव परिसरात डायनासोर, गॉडझिला

belgavkar.com | belgaum | belgavkar


बेळगाव : किल्ला तलावाच्या सुशोभिकरणाचा एक भाग म्हणून आता डायनासोर, गॉडझिला यासह इतर प्राण्यांच्या प्रतिकृती उभारण्यात येत आहेत. जवळपास पाच ते सहा ठिकाणी हे प्राणी बसवण्यात आले असून, आकर्षक बाकडीही बसवण्यात येत आहेत. किल्ला तलवाचे सुशोभिरकरण करण्यात येत आहे. यामध्ये बोटिंग, दुकान गाळे, बगीचा, खेळणी यासह सुमारे साडेपाच कोटींचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
याचा पहिला टप्पा म्हणून विविध प्राण्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. हे प्राणी बालचमुसाठी आकर्षण ठरणार आहेत. लवकरच या प्रतिकृतींचे अनावरण करण्यात येणार आहे. याच ठिकाणी रंगीत कारंजे आदी सजावटीही करण्यात येणार आहेत. यामुळे बेळगावच्या वैभवात भर पडणार आहे.