belgaum-बेळगाव-belgaum-doubts-over-the-quality-of-work-of-the-third-railway-gate-flyover-rob-belgavkar-belgaum-202210.jpeg | बेळगाव : RoB (तिसरे रेल्वे गेट उड्डाणपुल) च्या कामाच्या दर्जाबद्दल शंका | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : RoB (तिसरे रेल्वे गेट उड्डाणपुल) च्या कामाच्या दर्जाबद्दल शंका

belgavkar.com | belgaum | belgavkar

दर्जेदार काम झाले नसल्याने रस्त्यावर खड्डे

बेळगाव : टिळकवाडीतील तिसऱ्या रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाच्या अर्धवट विकासकामांचा फटका वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. दुसऱ्याच दिवशी हा उड्डाणपुलावरील रस्ता खराब झाला असल्याने या कामाच्या दर्जाबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. 4 वर्षानंतर तिसऱ्या रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या पुलाची काही विकासकामे अद्यापही अर्धवट अवस्थेत असल्याचे पहावयास मिळत आहे. प्रामुख्याने पुलाच्या रस्त्याचे काम व्यवस्थित पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे खानापूरकडून बेळगावकडे येणाऱ्या वाहनचालकांना पुलावरुन उतरताना आपली वाहने खड्डयातून न्यावी लागत आहेत.
रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले आहे. मात्र, दर्जेदार काम झाले नसल्याने रस्त्यावर उड्डाणपूल लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी खड्डे पडले आहेत. अवजड वाहनांमुळे तर या रस्त्याची अवस्था दयनीय होत चालली आहे. याकडे तात्काळ लक्ष न दिल्यास अल्पावधीत रस्त्याचा हा ठराविक भाग धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकार्पणानंतर उड्डाणपुलाची ही अवस्था झाल्यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्याप्रमाणे सदर उड्डाणपुलाची अन्य काही विकासकामे अद्यापही अर्धवट अवस्थेत आहेत. बुधवारी उड्डाणपुलाचे लोकार्पण झाल्यानंतर पहिल्याच रात्री उड्डाणपुलावरील पथदीप बंद होते. यामुळे येथून ये-जा करणाऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.