belgaum-बेळगाव-belgaum-improve-and-revive-development-3-lakes-in-the-northern-part-of-belgaum-city-belgavkar-belgaum-202210.jpeg | बेळगाव : 3 तलावांचे पुनरुज्जीवन | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : 3 तलावांचे पुनरुज्जीवन

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहराच्या उत्तर विभागातील 3 तलावांची सुधारणा करण्याचा , त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय

बेळगाव : बेळगाव शहराच्या उत्तर विभागातील 3 तलावांची सुधारणा करण्याचा, त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यात कणबर्गी, बसवण कुडची व अलारवाड येथील तलावांचा समावेश आहे. या तिन्ही तलावांच्या पुनरुज्जीवनाच्या कामाचा ठेका देण्यासाठी महापालिकेकडून निविदा काढण्यात आली आहे. कणबर्गी येथील तलावाच्या सुधारणेसाठी 1 कोटी 99 लाख रुपये खर्च होणार आहेत.
बसवण कुडची येथील तलावासाठी 1 कोटी 29 लाख रुपये, तर अलारवाड येथील तलावासाठी 1 कोटी 31 लाख रुपये खर्च करण्यात येतील.

कणबर्गी गावच्या हद्दीत सर्व्हे क्रमांक 103, 650 व 587 मध्ये तलाव आहे. त्या तलावाची सुधारणा केली जाणार आहे. कणबर्गी गावच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या तलावाची सुधारणा याआधीच स्मार्ट सिटी योजनेतून करण्यात आली आहे. त्या तलावामुळे गावच्या सौंदर्यात भर पडली आहे. त्या तलावात आता Water Sporting सुरु केले जाणार आहे.