news.jpg | बेळगाव : सावगांव नगरीत वारकरी-धारकरी ह. भ. प. बाळासाहेब कुंडलिक पाटील यांचे व्याख्यान | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : सावगांव नगरीत वारकरी-धारकरी ह. भ. प. बाळासाहेब कुंडलिक पाटील यांचे व्याख्यान

belgavkar.com | belgaum | belgavkar


बेळगाव : धर्माच्या मार्गावर, बलिदानाच्या मार्गावर अगदी कठोर मार्गक्रमण करत स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी धर्म टिकवला. पुण्यस्मरण म्हणून धर्मवीर बलिदान मास पाळला जातो. यानिमित्त व्याख्यानाच्या रुपात धर्मशिदोरी देण्यासाठी येत आहेत वारकरी-धारकरी ह. भ. प. बाळासाहेब कुंडलिक पाटील


स्थळ- श्रीशिवस्मारक सावगांव, ता. बेळगाव
11 मार्च 2022 रोजी सायंकाळी 07.30 ते 09


तरी समस्त धारकरी-वारकरी, हिंदुजनांनी या व्याख्यानाला उपस्थित राहून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मरण करावयाचे आहे.
पडले असंख्य जरी घाव तनु मनावर ।
आल्या भयाण आपदा जरी जीवनावर ।
थांबु न पाठ फिरवू न व्रतास त्यागू ।
शिवबा संभाजी समतुल्य सदैव वागू ।।
संभाजीराव भिडे गुरूजी