mother-suicide-with-two-children-at-belgaum-20200123.jpg | झालेल्या भांडणातून दोन मुलांसह महिलेची आत्महत्या | belgaum news | belgavkar बेळगावकर

झालेल्या भांडणातून दोन मुलांसह महिलेची आत्महत्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : दोन सवतींच्या भांडणात एकीने आपल्या दोन्ही मुलांसह कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना हुक्केरी तालुक्यातील अवरगोळ गावात घडली आहे. कौटुंबिक वादातून हि घटना घडली असून या घटनेत मल्लव्वा (वय 35) व तिची दोन्ही मुले सिद्धप्पा (वय 3) आणि गुरुनाथ (वय 10) यांचा मृत्यू झाला आहे.
Hukkeri-Police-Station-Belgaum.jpg | झालेल्या भांडणातून दोन मुलांसह महिलेची आत्महत्या | belgaum news | belgavkar बेळगावकर
मिळालेल्या माहितीनुसार, अवरगोळ गावातील बसवराज मारबस्सनावर याला पहिल्या पत्नीपासून सहा मुली झाल्याने त्याने घराला वारसदार व मुलाच्या हट्टासाठी गोकाक तालुक्यातील मल्लवा हिच्याशी दुसरा विवाह केला. विवाहानंतर मल्लव्वाला एक मुलगी आणि दोन मुलगे झाले. पण सवतींमध्ये काही ना काही कारणाने भांडणे होतच होती. काल गुरुवारी झालेल्या भांडणातून दुसऱ्या पत्नीने आपल्या दोन्ही मुलांसह कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी हुक्केरीचे पोलीस पीएसआय शिवानंद यांनी पाणबुड्यांच्या साहाय्याने तीनही मृतदेह कालव्यातून बाहेर काढले असून अधिक तपास करत आहेत.