Belgaum-Airport-Flight.jpg | सांबरा-बेळगाव एयरपोर्ट वरून आणखीन सहा ठिकाणी थेट विमानसेवा; वर्षभरात विकासाचे टेक ऑफ | belgaum news | belgavkar बेळगावकर

सांबरा-बेळगाव एयरपोर्ट वरून आणखीन सहा ठिकाणी थेट विमानसेवा; वर्षभरात विकासाचे टेक ऑफ

belgavkar.com | belgaum | belgavkar

'स्टार एअर' ची 1 एप्रिल पासून बेळगावहून देशातील आणखीन सहा मोठ्या शहरांत विनाथांबा विमानसेवा सेवा सुरू करणार असल्याची माहिती स्टार एअरचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिक घोडावत यांनी आज सकाळी ट्विट करून दिली. केंद्र सरकारच्या उडान -3 अंतर्गत प्रवाशांना बेळगावहून थेट सूरत, जोधपूर, नागपूर, नाशिक, जयपूर आणि तिरुपती या सहा ठिकाणी जाता येणार आहे. मार्च महिन्यापासून स्टार एअरच्या ताफ्यात अजून दोन विमाने येणार आहेत. उद्योगपती संजय घोडावत ग्रुपने गेल्या 10 वर्षांच्या अथक परिश्रमातून आपले स्वप्न आज सत्यात उतरवत आहे.
star-air-flight.jpg | सांबरा-बेळगाव एयरपोर्ट वरून आणखीन सहा ठिकाणी थेट विमानसेवा; वर्षभरात विकासाचे टेक ऑफ | belgaum news | belgavkar बेळगावकर
Star Air is an Indian commuter Airline
सद्या बेळगाव विमानतळावरून नागपूर, सुरतला जाण्यासाठी थेट विमानसेवा नसल्याने अनेक प्रवाशांना विविध ठिकाणी होत नागपूर तसेच सुरतला प्रवास करावा लागतो. व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या सुरतला मुंबईमार्गे जावे लागते. यामुळे विमानाने प्रवास करताना प्रवाशांचा वेळ वाया जातो. UDAN-3 योजनेअंतर्गत या यामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगला फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या, स्टार एअर मुंबई, अहमदाबाद आणि इंदूर या तीन ठिकाणी सेवा देत आहे. TruJet ट्रूजेट कंपनीने बेळगाव विमानतळावरून म्हैसूर, कोल्हापूर, हैदराबाद, तिरुपती, कडाप्पा या शहरांना जोडणारी आपली विमानसेवा सुरू केली आहे.
बेळगावचा स्मार्ट सिटीतील समावेशामुळे व उडाण-3 योजनेअंतर्गत देशातील अनेक महत्त्वाच्या विमान कंपन्यांनी आपली सेवा देण्यास सुरुवात केली आहे. ‘उडे देश का हर नागरिक’ या ब्रिद वाक्याखाली केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'उडान' योजनेच्या तिसऱ्या यादीत बेळगावचे नाव आल्यानंतर आता या योजनेंतर्गत एप्रिल-2020 पर्यंत बेळगावातून 20 शहरांसाठी सेवा मिळणार आहे. उडान योजनेअंतर्गत बेळगाव विमानतळाने वर्षभरात विकासाचे टेक ऑफ घेतले आहे.
अलीकडच्या काळात तर विमान प्रवाशांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. सध्या बेळगाव विमानतळावरून स्टार एअर, इंडिगो, एलायन्स एअर, स्पाईस जेट या विमान कंपन्यांची सेवा बेळगाव विमानतळावरून सुरू आहे. दररोज हजारो प्रवासी बेळगाव विमानतळावरून प्रवास करतात. नोव्हेंबरमध्ये 29000 प्रवाशांनी बेळगाव विमानतळावरून प्रवास केला आहे. मोठ्या विमानाची सेवा बेळगावहून सुरु होत आहे ही चांगली बाब आहे.
Belgaum - Jaipur
Belgaum - Jodhpur
Belgaum - Nagpur
Belgaum - Nasik
Belgaum - Surat
Belgaum - Tirupati
Shrenik Ghodawat - Stay tuned for some good frequency additions to existing routes soon and newer routes additions from Summer Schedule starting 1st April
  • Thank you for all the support and love for Star Air