attempted-assault-woman.jpg | विवाहितेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; एकाला अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

विवाहितेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; एकाला अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : खानापूर येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर अत्याचाराचा प्रयत्न करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला खानापूर पोलिसांनी गुरुवारी ( ता. 23) अटक केले आहे. सलीम मन्सूर इनामदार ( वय 25, रा. देवराई, ता. खानापूर ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. जखमी विवाहितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुधवारी ( ता. 23) देवराई गावाशेजारील तलावात 28 वर्षीय विवाहिता कपडे धुण्यासाठी गेली असता तिला उचलून नेऊन रेल्वेच्या बोगद्यात अतिप्रसंगाचा प्रयत्न संशयित मन्सूरने केला होता. विवाहितेने आरडाओरड करून विरोध केल्यानंतर पकडले जाण्याच्या भीतीने त्याने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. विवाहितेनेची आरडाओरडा ऐकून रेल्वे फाटकावरील गँगमन व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता मन्सूरने तेथून पळ काढला होता.
ही घटना समजल्यानंतर अनेक सामाजिक व इतर संघटनांनी संशयिताला अटक करण्याची मागणी केली होती. त्यामुळे दबावामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला होता. संशयिताने यापूर्वीही असे गैरकृत्य केल्याची चर्चा परिसरात असून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. अवघ्या 24 तासांच्या आत सलीमला न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक बसगौडा पाटील अधिक तपास करीत आहेत.