shiv-sena-chief-balasaheb-thackeray-birth-anniversary-yuva-samiti-belgaum-202001.jpg | बेळगावात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी; युवा समितीवर पोलिसांकडून दडपशाही | belgaum news | belgavkar बेळगावकर
हिंदुहृदयसम्राट - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 94 वी जयंती

बेळगावात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी; युवा समितीवर पोलिसांकडून दडपशाही

belgavkar.com | belgaum | belgavkar

सालाबादाप्रमाणे यावर्षी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने हिंदुहृदयसम्राट - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 94 वी जयंती गुरुवारी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. शहापूर येथील बॅरिस्टर नाथ पै चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी नगरसेवक नेताजी जाधव तसेच युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
shubham-shelke.jpg | बेळगावात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी; युवा समितीवर पोलिसांकडून दडपशाही | belgaum news | belgavkar बेळगावकर
Yuva Samiti Leader Shubham Shelke
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी हिंदुहृदयसम्राटांच्या नावाने जयघोष करून परिसर दणाणून सोडला. बाळासाहेबांच्या जयंती दिनानिमित्त उपस्थित कार्यकर्त्यांनी मिठाई वाटपही केले . यावेळी शुभम शेळके, श्रीकांत कदम, धनंजय पाटील, विजय जाधव, विशाल गौंडाडकर, सचिन केळवेकर, मंगेश पाटील, सिद्धार्थ चौगुले, आशिष कोचेरी, युवराज मलकाचे, किरण हुद्दार, नेताजी जाधव, संजय घाटे,बाळु जोशी, भरत पाटील यांच्यासह युवा समिती पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा समितीवर दडपशाही
आज सकाळी झालेल्या जल्लोष कार्यक्रमानंतर युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांना चौकशीसाठी मार्केट पोलिसांनी बोलावून दोन तासांहून अधिकवेळ पोलीस स्थानकात बसवून ठेवले आहे. युवा समितीच्या माध्यमातून सीमाप्रश्न, मराठी शाळेतील प्रश्न, विद्यार्थ्यांवरील अन्याय, मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आवाज उठविण्यास येत आहे.