First-Miniature-Airport-Belgaum-belgavkar-belgaum-news.jpg | व्हॅक्सिन डेपो बेळगाव येथे भारतातील सर्वात पहिले मिनिएचर एयरपोर्ट | belgaum news | belgavkar बेळगावकर

व्हॅक्सिन डेपो बेळगाव येथे भारतातील सर्वात पहिले मिनिएचर एयरपोर्ट

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगावमध्ये भारतातील पहिले मिनिएचर एअरपोर्ट उभारण्यात येणार असल्याची माहिती बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर यांनी ही दिली आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 6 कोटी रूपये खर्च येणार असून व्हॅक्सिन डेपो येथील जागा प्राथमिक स्वरूपात निश्चित करण्यात आली आहे. [येथे फक्त प्रतिकृती / मॉडेल निर्माण करण्यात येणार आहेत. खरेखुरे विमान वगैरे काही उडणार नाही.]
First-Miniature-Airport-Belgaum-belgavkar-belgaum-news-belgav.jpg | व्हॅक्सिन डेपो बेळगाव येथे भारतातील सर्वात पहिले मिनिएचर एयरपोर्ट | belgaum news | belgavkar बेळगावकर
हँबर्ग-जर्मनी येथील वंडरलैंडमधील मिनीएचर एअरपोर्टच्या धर्तीवर मिनिएचर एअरपोर्टची उभारणी केली जाणार आहे. या एअरपोर्टवर विमानतळाशी संबंधित चेक इन, चेक आऊट, बोर्डींग, रनवे, लँडिंग, विमानाचे पार्किंग आदी सर्वांचा अभ्यास मुलांना करता येणार आहे. तसेच व्यावसायिक विमानांच्या प्रतिकृती बरोबरच भारतीय हवाई दलाकडून वापरल्या जाणाऱ्या मिग फायटर जेट, सुखोई यासारख्या लढाऊ विमानांच्या लघु प्रतिकृतीही पहावयास मिळणार असून विद्यार्थ्यांना विमानांसंबंधीची माहिती मिळू शकणार आहे.
व्हॅक्सिन डेपो येथे आर्ट गॅलरीचे निर्माण केले जाणार असून यासाठी 12 कोटी रुपये खर्च येणार आहे. या नियोजित आर्ट गॅलरीच्या माध्यमातून भारताच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे.
एव्हिएशन म्युझियम / गॅंलरी (विमान संग्रहालय) सध्या रिकाम्या असलेल्या ग्लास हाऊसमध्ये उभारण्यात येणार आहे.
ग्लास हाउस शेजारील खुल्या जागेत आर्ट म्युझियम (कला संग्रहालयाची) उभारणी केली जाणार असून प्रतिकृती आणि डिजिटल यंत्रणेच्या माध्यमातून विमानांची माहिती दिली जाणार आहे.
First-Miniature-Airport-Belgaum-India