swapnil-kulkarni-suicide-dead-20200122.jpg | बेळगांव येथे युवकाची आत्महत्या; शहरात दोन युवकांची आत्महत्या | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगांव येथे युवकाची आत्महत्या; शहरात दोन युवकांची आत्महत्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : शहरात आज दोन युवकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बसवाण गल्ली व केळकरबाग येथील युवकांनी आत्महत्या केली.

बसवाण गल्ली येथील एका युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. स्वप्निल कुलकर्णी (वय 23, रा. बसवाण गल्ली) असे युवकाचे नांव आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. घटनास्थळी पोलीस तपास करत आहेत. ही घटना खडेबाजार पोलीस स्थानक हद्दीत घडली आहे. स्वप्नील हा केएलईमध्ये एमबीए करत होता.
santosh-narim-20200122.jpg | बेळगांव येथे युवकाची आत्महत्या; शहरात दोन युवकांची आत्महत्या | belgaum news | belgavkar बेळगावकर
केळकरबाग येथील एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी 4 वाजता घडली आहे. संतोष शांताराम नरीम (वय 25, रा. केळकरबाग) असे युवकाचे नांव आहे. घरात कोणी नसताना संतोषने गळफास लावुन घेतला. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. उपचारासाठी त्याला बेळगांव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेची खडेबाजार पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.
शहरांमध्येही आत्महत्या का वाढू लागल्या आहेत? सामाजिक स्थिती, कौटुंबिक कलहांपासून विविध कारणांची नोंद या आत्महत्यांमागे होत असते. यावर मात कशी करणार? आत्महत्या रोखण्यासाठी नक्की कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत?
चार शब्द प्रेमाचे हवेत
वाढत्या तणावात जगणा-या माणसाला आता आपल्या माणसांचाच चेहरा अभावाने बघायला मिळतो. अपेक्षांचे वाढते ओझे, जबाबदा-यांचा डोंगर यात अडकलेल्या माणसाला आता मृत्यूला आलिंगन देऊन सगळ्या गोष्टीचा निकाल लाऊन मोकळे व्हावेसे वाटत आहे. कर्जबाजारी झालेले शेतकरी तर शहरांत वैफल्यग्रस्त बेळगांवकर आत्महत्येचा पर्याय स्वीकारत आहेत. आत्महत्येचे वाढते सत्र निश्चितच समाजासाठी घातक असल्याने वेळीच आत्महत्या रोखण्याचा विचार वाचकांनी मांडला. आत्महत्येचे सत्र रोखायचे असेल तर समाजानेच पुढे यायला हवे, हा विचारही वाचकांच्या पत्रांतून व्यक्त झाला. कौंटुबिक कलहातून घरातील सदस्य नैराश्येच्या चक्रव्यूहात अडकत असेल तर घरातील इतर सदस्यांनी आपल्या सदस्याकडे कानाडोळा करू नये. खिलाडू वृत्तीने आयुष्य जगत येणा-या आव्हानांचा बिनदिक्कत सामना केल्यास आयुष्य जगता येते, अनुभवता येते. त्यामुळे आयुष्य नाकारू नका, असा सल्ला वाचकांनी दिला.
जगण्याची जिद्द हवी
सामाजिक अस्थैर्य, प्रतिष्ठा आणि कौटुंबिक कलह या गोष्टींचा परिपाक म्हणजे आत्महत्या. आत्महत्या हा सर्व समस्यांवरचा अंतिम उपाय नव्हे. जीवनात येणा-या संकटांचा मुकाबला स्वत: व कुटुंबासमवेत करणे हे निरोगी मनोवृत्तीचे लक्षण आहे. नैराश्याने ग्रासल्यास कुटुंबाशी बोलणी करावी. आत्महत्येचा अतिरेकी मार्ग पत्करून काहीही निष्पन्न होत नाही याचे भान ठेवावे. जीवनात चढ-उतार, खाचखळगे येतच असतात. केवळ संवेदनशील राहून चालत नाही. थोडं कठोर होऊन जिद्दीने जगलेच पाहिजे व कुटुंबाला आधार दिला पाहिजे.- दिलीप अक्षेकर, माहीम
मनाला खंबीर बनवा
जीवनातला प्रत्येक क्षण हा संघर्षाने, संकटांनी, आव्हानांनी, समस्यांनी भरलेला असतो. निराशा, अपयश, राग, मत्सर अशा एक ना अनेक कारणांना मनुष्याला तोंड द्यावे लागते. मात्र, दु:खाबरोबरच्या सामन्यात, ज्याला यश मिळत नाही, ज्यांना दु:खाला भिरकावून देता येत नाही किंवा सुख असो अथवा दु:ख असो ती कवटाळून बसत, त्याबाबतचा समतोल विचार ज्याला करता येत नाही तो मात्र या जीवन संघर्षात पराभूत होतो. तोच शेवटचा पर्याय म्हणून आत्महत्येचा पर्याय स्वीकारतो. जीवनातून पलायन करणा-यांची किंवा निराशा, मानसिकता, दुर्बलता यांची शिकार होण्याची संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे. आत्महत्येच्या विरोधात मोठी जनजागृतीची मोहीम उघडावी लागेल. प्रत्येक परिस्थितीला शरण जाणा-या दुबळ्या मनांना समर्थ बनवण्याच्या योजना राबवाव्या लागतील. शिक्षणाबरोबरच आत्मविश्वास वाढविणारा संस्कार आणि जगण्याचे ध्येय समजावून देणारा व्यवहार तितकाच महत्त्वाचा ठरतो.- दादासाहेब येंधे
जगी सर्व सुखी असा कोण नाही
हसणे आणि हसवणे ही कला आत्मसात करण्यासाठी मुळात मनात खिलाडू वृत्ती हवी. ठेच लागल्याशिवाय किंवा पडल्याशिवाय चालता येत नाही, ते काही उगीच नाही. ठेच लागली म्हणून चालणेच सोडले तर कायमचे अपंगत्व येईल. आयुष्याचेदेखील असेच आहे. चालणे हा मानवाचा दैनंदिन कामातील महत्त्वाचा भाग आहे. लढणे ही योद्धय़ाची ओळख आहे. मानव म्हणून न अडळखता सदोदित चालत राहिलात तरीही खूप झाले. आजचे चित्र पाहता वाढत्या व्यापाला कंटाळत आता सुशिक्षित माणसेही आत्महत्येचा पर्याय स्वीकारत आहेत. असुरक्षिततेच्या भावनेतून महिला, उद्रेकाच्या भावनेतून पोलिस मृत्यूला आलिंगन देत आहे. आपल्या शेजारच्याला, कार्यालयातील मित्राला, नातेवाइकांना जगण्याची जादू शिकवा. एकत्र राहून वैफल्यग्रस्तांना जगण्याचे बळ द्या. – सुभाष वाघवणकर
अरे माणसा, आयुष्य मोलाचे आहे रे...
बेळगांवसारख्या शहरात दोन दिवसांत 3 जणांनी आत्महत्या करणे हा प्रकार अधिक धक्कादायक वाटतोय. आजचे जीवन स्पर्धात्मक झाले आहे. माणूस यश-अपयशाने भयभीत झाला आहे. आजच्या युगात नोकरी, शिक्षण, व्यवसाय पोटापाण्याच्या प्रश्नाने मेंदूस घेरले आहे. अनेक प्रकारचे तणाव निर्माण झाल्यास नैराश्याच्या भरात आत्मघात करण्याचा मार्ग अवलंबिला जातो. या वेळी जवळपासच्या माणसाकडून समुपदेशाची आवश्यकता आहे. जीवनातील संघर्ष आणि तणावावर मात करा. क्षमता वाढविल्यास बिनधास्तपणे जगण्याचा प्रयत्न करा. – belgavkar
आत्महत्या पर्याय नाही
आम्हाला शेतक-यांच्या आत्महत्या रोखता आल्या नाहीत, शहरातील माणसांच्या आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न या राजकारण्यांकडून होईल, असा विचार ख-या अर्थाने मिश्कीलतेने घेण्यासारखा आहे. कोटींचे कर्ज असताना राजकारणी आत्महत्या करत नाहीत. तुम्ही का करता? राजकारण्यांकडून प्रेरणा घ्या. निर्लज्जम् सदासुखी असलेल्या या राजकारण्यांना काही फरक पडत नाही. अशातच ताणतणावात अडकलेल्या बेळगांवकरांनी आत्महत्येचा पर्याय स्वीकारणे पटत नाही. बेळगांवकर हा योद्धा म्हणून ओळखला जातो. आपल्या वाईट काळात आपल्याला प्रेमाचे चार शब्द बोलणारा कोणीही नसेल तर मनाचा हिरमोड होतो. इथूनच मनाची झुंज सुरू होते. सततच्या अपयशाने खचलेल्या माणसाला जग, आप्तस्वकीय झिडकारत असेल तर कोणाच्याही मनात आत्महत्येचा विचार काही क्षणासाठी येईल. हे आत्महत्या सत्र रोखायचे असेल, तर प्रबोधन हा एकमेव मार्ग दिसतो.