No-Electricity-HESCOM-Belgaum.jpg | 3 दिवस बेळगाव दक्षिण भागातील वीजपुरवठा खंडित : हेस्कॉम | belgaum news | belgavkar बेळगावकर

3 दिवस बेळगाव दक्षिण भागातील वीजपुरवठा खंडित : हेस्कॉम

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : हेस्कॉमकडून केबल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे दक्षिण भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. दि. 20, 21 व 22 जानेवारी असे तीन दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
सोमवार दि. 20 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6
बाजार गल्ली शहापूर, भारतनगर, वडगांव रोड, यरमाळ रोड, सोनार गल्ली, साईनगर, केशवनगर, विष्णू गल्ली, येळ्ळूर रोड, रामदेव गल्ली, संभाजीनगर, आदर्शनगर, आनंदनगर, अन्नपूर्णेश्वरी नगर, रणझुंझार कॉलनी, समृद्धी कॉलनी, पटवर्धन लेआऊट, गाडे मार्ग शहापूर व आदी भाग
मंगळवार दि. 21 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6
हुलबत्ते कॉलनी, एसपीएम रोड, गुड्सशेड रोड, आठले गल्ली, शास्त्रीनगर व आदी भाग
बुधवार दि. 22 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6
सोमवार पेठ ते शुक्रवार पेठपर्यंत, खानापूर रोड, आरपीडी कॉलेज रोड, सराफ कॉलनी, मिलेनियम गार्डन रोड, इंद्रप्रस्थनगर, ओल्ड गुड्सशेड रोड व आदी भाग

संबंधित नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे हेस्कॉमतर्फ (HESCOM : Hubli Electricity Supply Company Limited) कळविण्यात आले आहे.