Belgaum-Train-Railway.jpg | पुणे - बेळगाव जनशताब्दी एक्स्प्रेस फेब्रुवारीपासून; केवळ 7 तास प्रवास | belgaum news | belgavkar बेळगावकर

पुणे - बेळगाव जनशताब्दी एक्स्प्रेस फेब्रुवारीपासून; केवळ 7 तास प्रवास

belgavkar.com | belgaum | belgavkar

पुणे - बेळगाव दरम्यान 9 फेब्रुवारीपासून जनशताब्दी एक्स्प्रेस सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बेळगावचे खासदार श्री सुरेश अंगडी यांच्या विशेष प्रयत्नानुसार ही एक्स्प्रेस सुरु होणार आहे. पुणे, रेल्वे स्थानकावर 9 फेब्रुवारीला या जनशताब्दी एक्स्प्रेसचे उद्घाटन होणार असल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे.
सद्य : स्थितीत पुणे - बेळगावदरम्यान थेट जाणारी एकही रेल्वे उपलब्ध नसून जनशताब्दीमुळे सोय होईल. ही एक्स्प्रेस लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, रायबाग या प्रमुख रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे.
पुण्याहून बेळगावसाठी सकाळी 6 वाजता ही एक्स्प्रेस निघून दुपारी 2 वाजता बेळगावला पोचेल. मात्र, अधिकृतपणे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल.