belgaum- nh4-accident-dead-gandhinagar-20200114.jpg | राष्र्टीय महामार्ग-4 गांधीनगरजवळ अपघातात युवक जागीच ठार  | belgaum news | belgavkar बेळगावकर

राष्र्टीय महामार्ग-4 गांधीनगरजवळ अपघातात युवक जागीच ठार 

belgavkar.com | belgaum | belgavkar

भरधाव दुचाकीची दुभाजकाला धडक बसून युवकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता राष्र्टीय महामार्ग-4 वर गांधीनगर मुचंडी गॅरेज जवळ ही घटना घडली. या घटनेत यल्लाप्पा विठ्ठल माजोजी (वय 25, रा. आवरोळी, ता. खानापूर) या युवकाचा मृत्यु झाला.
मिळालेल्या माहितीनुसार यल्लाप्पा कामानिमित्त काकतीकडे जात असताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकीची दुभाजकाला धडक बसली. व यल्लाप्पा महामार्गावरच पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व जागीच ठार झाला. या घटनेची नोंद वाहतुक उत्तर विभाग पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.