• Facebook
  • Youtube
  • Whatsapp
  • Instagram
  • Twitter
viral-video-teacher-record-student-pronunciation-20200114.jpeg | व्हायरल व्हीडीओनंतर राज्याने घातली शाळांमध्ये शिक्षकांच्या मोबाईल वापरावर ‘बंदी’  | belgaum news | belgavkar बेळगावकर
Viral Video Thumbnail

व्हायरल व्हीडीओनंतर राज्याने घातली शाळांमध्ये शिक्षकांच्या मोबाईल वापरावर ‘बंदी’ 

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक : वर्गामध्ये मुलांनी मोबाईल फोन वापरणे ही आपल्याकडे शिक्षणव्यवस्थेतील मोठी समस्या ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच एका शिक्षकाने चालू लेक्चरमध्ये विद्यार्थ्याला शब्द उच्चारता न आल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला. बळ्ळारी येथील सरकारी शाळेत घटना घडली असुन त्या शिक्षकाचे निलंबन करण्यात आले आहे. आता याबाबतीत कर्नाटक सरकारने एक कठोर निर्णय घेत प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांना मोबाइल फोन वापरण्यास बंदी घातली आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती राज्याचे शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली.
s-sureshkumar-karnataka.jpg | व्हायरल व्हीडीओनंतर राज्याने घातली शाळांमध्ये शिक्षकांच्या मोबाईल वापरावर ‘बंदी’  | belgaum news | belgavkar बेळगावकर
Education Minister Karnataka
ते म्हणाले की, सरकारने एक परिपत्रक काढले आहे, ज्यामध्ये शाळांमध्ये शिक्षकांना मोबाइल फोन वापरावर बंदी घातली आहे. आजपासून हा आदेश लागू होईल. तसेच सतत तक्रार येत होती की वर्गातील शिक्षक मोबाइल फोनचा खूप वापर करतात. या तक्रारींची दखल घेत राज्याच्या शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढले आहे. मोबाइल वापरण्यावर बंदी असूनही जर एखादा शिक्षक आपल्या वर्गात मोबाईल फोन वापरत असल्याचे आढळले तर शाळेचे प्रभारी त्यांच्यावर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई करू शकतात असेही विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे शाळा आणि एकूणच शैक्षणिक पद्धतीत शिस्तबद्धता येईल असते मत व्यक्त होत आहे. पण शिक्षक संघटनांकडून यावर नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे. परंतु एकंदरीतच या निर्णयाचे स्वागत होत असल्याचे दिसत आहे.
हरियाणानेही घातली होती बंदी@यापूर्वी सन 2017 मध्ये हरियाणाच्या सरकारी शाळांमध्येही शिक्षकांना वर्गात मोबाइल फोन नेण्यास बंदी घातली होती.