hukkeri_police_arrested_two_20200114_belgaum_news_belgavkar.jpg | जेलमधून झाला होता फरारी; चोरी प्रकरणात अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

जेलमधून झाला होता फरारी; चोरी प्रकरणात अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगांव : काही महिन्यांपूर्वी हुक्केरीच्या सब जेलच्या टॉयलेटची खिडकी तोडून पळून गेलेल्या एकाला पोलीसांनी चोरी प्रकरणात अटक केली आहे. परशुराम उर्फ पारस कामटेकर (वय 22, रा. कुन्नुर ता. गोकाक) नामक तरुण बंद घरे हेरून घरफोड्या करायचा. 2018 ला अर्बन बँक चोरीप्रकरणी अटक करून पारसला कारागृहात धाडण्यात आले होते. पण तो तिथून पळून गेला होता.
पोलीस त्याचा शोध घेत असतानाच राष्र्टीय महामार्ग हुक्केरी येथील विरप्पा हळदी यांच्या घरात चोरी केली. संशयास्पद फिरणाऱ्या अन्वर मुलतानी (वय 21, कब्बुर, ता. हुक्केरी) आणि परशुराम कामटेकर  या दोघांना हुक्केरी पोलिसांनी अटक करून कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीचि कबुल दिली. त्यांच्याजवळून 1 लाख 33 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 12 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. हुक्केरीचे सीपीआय गुरुराज कल्याणशेट्टी, यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शिवानंद गुडगनट्टी, यमकनमर्डीचे एएसआय रमेश पाटील, यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.