• Facebook
  • Youtube
  • Whatsapp
  • Instagram
  • Twitter
auto-rickshaw-driver-runs-free-auto-ambulance-service-Belgaum-202001.jpg | रिक्षाचा वापर रुग्णवाहिकेप्रमाणे; 'रात्रीचा रुग्णवाहक' | belgaum news | belgavkar बेळगावकर

रिक्षाचा वापर रुग्णवाहिकेप्रमाणे; 'रात्रीचा रुग्णवाहक'

belgavkar.com | belgaum | belgavkar

शेजारी राहणाऱ्या गर्भवती महिलेला रात्रीच्या वेळेस रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे त्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने प्रेरित होवुन दिवसभर खासगी कंपनीत काम करून रात्री रिक्षाचा वापर रुग्णवाहिकेप्रमाणे करत गरजूंना मदत करणारे मंजुनाथ पुजारी यांच्या कामाची दखल देशपातळीवर घेण्यात आली आहे. या कार्यातून त्यांच्या नावाची नोंद 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये झाली आहे. रात्रीचा रुग्णवाहक असा त्यांचा गौरव केला आहे.
तीन वर्षात रात्रीच्या वेळेस 150 रुग्णांना मदत करत 40 हून अधिक जणांचे प्राण वाचविले आहेत. मंजुनाथ पुजारी हे येथील आयएल अॅन्ड एफएस ग्रुप ऑफ कंपनीमध्ये ऑफिस असिस्टंट म्हणून काम करतात. दिवसभर कंपनीमध्ये काम करून रात्री ते रुग्णवाहकाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याकडे असलेल्या ऑटोरिक्षालाच त्यांनी गरजूंसाठी रुग्णवाहिका केली असून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता ही सेवा ते मागील तीन वर्षापासून सायंकाळी 6 ते सकाळी 9 यावेळेत त्यांच्याशी कोणीही या सेवेसाठी मागणी केल्यास ते रुग्णाकडे पोचतात.

Emergency Hospitalization @Night
Please contact on : 9964375115 / 9449014362
रात्री रुग्णाच्या आपत्कालीन स्थितीत त्यांच्याशी संपर्क साधल्यास आपल्या रिक्षा+रुग्णवाहिकेला घेऊन ते रुग्णाकडे पोचतात. त्यांच्या कामाची हीच दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. त्यांचे हे कार्य इतरांनाही प्रेरणादायी ठरणारे आहे.