yellur-gram-panchayat-belgaum-20200113.jpg | 'आमची संपत्ती आमचा कर' या योजनेंतर्गत वार्डप्रमाणे करवसुली मोहीम | belgaum news | belgavkar बेळगावकर

'आमची संपत्ती आमचा कर' या योजनेंतर्गत वार्डप्रमाणे करवसुली मोहीम

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगांव : येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या माध्यमातून 'आमची संपत्ती आमचा कर' या योजनेंतर्गत करवसुली मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला बुधवार दि. 15 पासून विभागवार सुरुवात करण्यात येणार आहे. पंचायत हद्दीतील गावामध्ये वार्डप्रमाणे कर वसुल अभियान राबविण्यात येणार आहे. मासिक बैठकीमध्ये ठराव करुन विभागवार ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत 16/01/2020 पासून 15/02/2020 या कालावधीमध्ये कर भरणार्या घरमालकांना 10 टक्के सूट देखील दिली जाणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्राम पंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले आहे येळ्ळूरमध्ये मोठ्या प्रमाणात घरपट्टी व पाणीपट्टी थकीत आहे. त्यामुळे विकास कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. जर संपूर्ण कर वसूल झाल्यास निश्चितच गावचा विकास होऊ शकतो. यासाठी 'आमची संपत्ती आमचा कर' ही मोहीम राबविण्यात येणार आहे.