belgaum-mutton-market-seized-20200113.jpg | बेळगांव पालिका, 40 मटण दुकानांना ठोकले टाळे | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगांव पालिका, 40 मटण दुकानांना ठोकले टाळे

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगावातील मटण दरवाढीनंतर आता मटण दुकानांचे थकीत भाडे व महसुल करामुळे बेळगांव पालिका विभागाने कारवाई केली आहे. कसाई गल्ली येथील 40 मटण दुकान तसेच एका कत्तलखान्याला टाळे ठोकले आहेत. मटण दरवाढीचा मुद्दा अजून वादग्रस्त बनला असतानाच अधिकार्यांनी मटण मार्केटवरच कारवाई केली आहे.
बेळगावात मटण दुकानांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल आहे. पण लाखो रुपयांचे थकीत भाडे व महसूल भरलेला नाही. महसूल निरीक्षक नंदू बांदीवडेकर यांनी पालिका आयुक्त के. एच. जगदीश यांच्या आदेशानुसार मटण मार्केटमधील 40 दुकाने आणि एका कत्तलखान्याला टाळे ठोकले आहेत. मटण विक्रेत्यांकडील सुमारे 46 लाखाचे थकीत गाळा भाडे व्याजासकट वसूल करण्यात येत आहे. पण भाडे भरण्यात आले नाही.