Karnataka-High-Court.jpeg | सर्व जिल्हा व तालुका न्यायालयांमधील कामकाजाच्या वेळेत बदल | belgaum news | belgavkar बेळगावकर

सर्व जिल्हा व तालुका न्यायालयांमधील कामकाजाच्या वेळेत बदल

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक : राज्यातील सर्व जिल्हा व तालुका न्यायालयांमधील कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांनी 30 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. 1 जानेवारी 2020 पासून या नवीन वेळापत्रकानुसार कामकाज सुरू राहणार आहे. न्यायालयीन कामकाजासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी कामाच्या वेळेत बदल करण्यात आल्यामुळे आता नववर्षापासून कामकाजासाठी 30 मिनिट अधिक वेळ मिळणार आहे.
वेळ कामकाज
सकाळी 11 ते दुपारी 2 पहिल्या सत्रातील न्यायालयाचे कामकाज
दुपारी 2 ते 2.45 जेवण
दुपारी 2.45 ते सायंकाळी 5.45 दुसऱ्या सत्रातील न्यायालयाचे कामकाज

जेवणाची वेळ 15 मिनिटे कमी करण्यात आली आहे (पूर्वीचा जेवणाचा वेळ : दुपारी 2 ते 3). तसेच कामकाजाचा वेळ सायंकाळी 5.30 ऐवजी 5.45 पर्यंत वेळ वाढविण्यात आली आहे. महिन्याच्या चौथ्या शनिवारी असलेली सुटी रद्द करून त्या दिवशी न्यायालयाची कामे सोडून कार्यालयातील इतर कामे करावी लागणार आहेत. अधिकारी व कर्मचारीवर्गासाठी कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. त्यांच्यासाठी दुपारी 2 ते 2. 45 ही जेवणाची वेळ राहिल.