soldier-dead-belgaum-in-jammu-rahul-20191108.jpg | हुतात्मा जवान राहुल सुळगेकर याला शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप... | belgaum news | belgavkar बेळगावकर
जवान 'राहुल सुळगेकर'

हुतात्मा जवान राहुल सुळगेकर याला शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप...

belgavkar.com | belgaum | belgavkar

'अमर रहे' च्या जयघोषात शहीद जवानाला अखेरचा निरोप...

rahul-sulagekar-soldier-dead-army-jammu-kashmir-belgav.jpeg | हुतात्मा जवान राहुल सुळगेकर याला शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप... | belgaum news | belgavkar बेळगावकर
हुतात्मा जवान राहुल सुळगेकर याला शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप...
जवानाचे पार्थिव शनिवारी (दि. 9) वायुसेनेच्या विशेष विमानाने सांबरा विमानतळ येथे आणण्यात आले. शहीद झालेल्या जवानाला सांबरा विमानतळवर मानवंदना देण्यात आली. यावेळी पालकमंत्री, बेळगांव आमदार, पोलीस प्रशासन, मान्यवर व ईतर बेळगावकरांनी शहीद राहुल यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करीत अभिवादन केले.
त्यानंतर जवानाच पार्थिव बेळगावातल्या त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आलं. सांबरा विमानतळ ते उचगांव गावावरील मार्गावर रांगोळी काढण्यात आल्या होत्या. मार्गावर फुलांच्या पाकळ्या अर्पण केल्या. सायंकाळी 6च्या सुमारास जवानाच्या पार्थिवावर मूळगावी उचगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
'अमर रहे' च्या जयघोषात शहीद जवानाला अखेरचा निरोप...
army-jawan-dead-belgaum-jammu-kashmir-terrorist-rahul-sulagekar-belgavkar.jpg | हुतात्मा जवान राहुल सुळगेकर याला शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप... | belgaum news | belgavkar बेळगावकर
बेळगावचा जवान 'राहुल सुळगेकर' जम्मू काश्मीरमध्ये हुतात्मा;
जम्मू येथे बेळगाव तालुक्यातील उचगाव गावच्या सुपुत्रास वीरमरण प्राप्त झाले आहे. राहुल भैरू सुळगेकर (वय 24 रा.मारुती गल्ली उचगाव) असे हुतात्मा जवानाचे नाव आहे. जम्मू येथे दशहतवाद्यांशी लढताना त्याला वीरमरण प्राप्त झाले आहे. जम्मू -काश्मीर येथील पूंछ भागात गुरुवारी रात्री झालेल्या चकमकीत चार वर्षांपूर्वी मराठा रेजिमेंट सैन्यदलात भरती झालेला जवान हुतात्मा झाला. सैनिकी परंपरा असलेल्या घरातून राहुल सुळगेकर हे चार वर्षांपूर्वी सैन्य दलातील मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले होते. जवान राहुल यांचे वडील सैन्यदलातून निवृत्त झाले असून मोठा भाऊ मयूर हा देखील सैन्यदलात कार्यरत आहे. या दुःखद निधनामुळे संपूर्ण बेळगाववार शोककळा पसरली आहे. शुक्रवारी त्याचे पार्थिव बेळगावला आणण्यात येणार आहे.
IMG_soldier-rahul-sulagrkar-belgav.jpg | हुतात्मा जवान राहुल सुळगेकर याला शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप... | belgaum news | belgavkar बेळगावकर
जवानावर उद्या दुपारी उचगांव येथे अंत्यसंस्कार...
उद्या शनिवार दुपारी 12च्या सुमारास जवानाचे पार्थीव बेळगाव सांबरा विमानतळावर आणण्यात येणार आहे. सांबरा विमानतळावर बेळगाव जिल्हा प्रशासन, पोलीस खाते, स्थानीक प्रशासन व सैन्यातर्फे श्रद्धांजली वाहण्यात येणार.
त्यानंतर बेळगाव मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट येथे पार्थीव नेण्यात येणार असुन आर्मीतर्फे श्रद्धांजली वाहण्यात येणार.
त्यानंतर तेथुन त्यांच्या मूळ गावी उचगांव येथे लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
वीर जवान अमर रहे | सेवा बजावत असताना जवान राहुल शहीद;
जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे बंदोबस्तावर असताना गुरुवारी रात्री दहशतवाद्यांबरोबर चकमक उडाली. या चकमकीमध्ये जवान राहुल सुळगेकर यांना वीरमरण आले. याची माहिती लष्कर आणि प्रशासनाच्या वतीने शहीद जवान राहुल सुळगेकर यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली.
soldier-rahul-sulagekar-belgaum.jpg | हुतात्मा जवान राहुल सुळगेकर याला शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप... | belgaum news | belgavkar बेळगावकर
जम्मू-कश्मीर येथे पाकिस्तान सीजफायर उल्लंघन केले होते. जम्मू कश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील पूंछ जिल्ह्यात कृष्णघाटी सेक्टरमध्ये पाकड्यांनी मोर्टारचा मारा केला. यात जखमी झालेला एक जवान उपचारादरम्यान शहीद झाला आहे.
soldier-dead-belgaum.jpg | हुतात्मा जवान राहुल सुळगेकर याला शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप... | belgaum news | belgavkar बेळगावकर
दरम्यान, जवान पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर देत असून ही चकमक अद्यापही सुरू आहे. घटना मेंढर सब-डिवीजन च्या केजी सेक्टर येथे घडली आहे.