बेळगाव : सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांच्या मदतीला धावले; अवघ्या अर्ध्या तासात दिले रक्त

बेळगाव : सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांच्या मदतीला धावले;
अवघ्या अर्ध्या तासात दिले रक्त

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगावचे प्रसिद्ध सर्पमित्र आनंद चिठ्ठी (वय 40) यांना हिरेबागेवाडी येथे नाग साप पकडताना सर्पदंश झाल्यामुळे त्यांची प्रकृती खालावलेली आहे. वर्षीय चिठ्ठी यांना तातडीने केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्पमित्र आनंद चिठ्ठी त्यांच्यावर केएलई हॉस्पीटल येथील मार्कडेंय वाॅर्डच्या अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) उपचार सुरू आहेत. सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांच्या मदतीला धावून जात फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या टिमने त्यांच्यासाठी अवघ्या अर्ध्या तासात 5 युनिट रक्त उपलब्ध करून दिले आहे.
येळ्ळूर (ता. बेळगाव) येथील सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांना गुरुवारी सकाळी हिरेबागेवाडी येथे सर्पदंश झाल्याची घटना घडली. विषारी सापाने दंश केल्याने त्यांना केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान त्यांना तातडीने रक्ताची गरज होती. या आपत्कालीन परिस्थितीत फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर, प्रा. भरमा कोलेकर, राहुल चिकोर्डे व अँब्युलन्स चालक गणेश रोकडे हे मदतीला धावून आले. सर्पांचे जीव वाचवण्यासाठी धडपडणार्‍या सर्प मित्राच्या मदतीला फेसबुक फ्रेंड्स सर्कल क्षणाचाही विलंब न करता धावून गेले.
दरेकर यांनी रक्तदात्यांची संपर्क साधून कार आणि अँब्युलन्समधून अवघ्या 30 मिनीटात त्यांना घेऊन हॉस्पिटल गाठले. तसेच आनंद चिठ्ठी यांच्यासाठी 5 युनिट रक्त उपलब्ध करून दिले. यासाठी आनंद शाह, विनायक रायचन्नवर, निखिल बाळेकुंद्री, अजनास सय्यद व हितेश खोडा या रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांच्या प्रकृतीत आता थोडीफार सुधारणा झाली आहे. याचवेळी मलप्रभा वाॅर्ड येथील रालिया मोहरे या रुणाला देखील रक्ताची आवश्यकता होती. यावेळी चेतन भागी यांनी त्यांना रक्तदान केले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांच्या मदतीला धावले; अवघ्या अर्ध्या तासात दिले रक्त

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm