बेळगाव : कणबर्गी तलावात युवकांनी तिला वाचवले

बेळगाव : कणबर्गी तलावात युवकांनी तिला वाचवले

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : घरातील क्षुल्लक भांडणातून रागाच्या भरात कणबर्गी तलावात येऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धेला युवकांनी वाचवले. रुक्मिणी पाटील (वय 73, रा. खणगाव, ता. बेळगाव) असे त्या महिलेचे नाव आहे. वृद्धेने तलावात झोकून दिले तेव्हा हे तरुण येथे मासेमारी करीत होते. घरात झालेल्या किरकोळ भांडणातून खणगाव येथील शेतातील वस्तीतून रुक्मिणी या तब्बल चार ते पाच किलोमीटर चालत कणबर्गी तलावाजवळ आल्या. या ठिकाणी स्वतःला तलावात झोकून देत आत्महत्येचा प्रयत्न केला.
या ठिकाणी 15 ते 18 वयोगटातील 4 मुले मासे पकडत होती. वृद्धा तलावात पडल्याचे पाहताच यातील दोघेजण धावत पुढे गेले. ती बुडण्यापूर्वीच तिला बाहेर काढले. त्यानंतर मुलांना काय करावे समजले नाही. त्यांनी ही माहिती वन टच फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांना दिली. त्यांनी सोबत फेसबुक फ्रेन्डचे संतोष दरेकर, गणेश येळ्ळूरकर, आदर्श पाटील यांना घेऊन तलाव गाठला. या वृद्धाची विचारपूस करून तिला तिच्या खणगाव येथील घरी नेले. घरच्यांना समजावून वृद्धेला त्यांच्याकडे सुपर्द केले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कणबर्गी तलावात युवकांनी तिला वाचवले

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm