बेळगाव : त्या गो-शाळेला केली मदत; लाखो रुपयांचे झालयं नुकसान

बेळगाव : त्या गो-शाळेला केली मदत;
लाखो रुपयांचे झालयं नुकसान

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कलखांब (ता. बेळगाव) येथील श्री सिद्धेश्वर गो - शाळेच्या आवारात सोमवारी 9 मार्च रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास आग लागून गवतगंजीसह इतर साहित्य भस्मसात झाले आहे. त्यामुळे सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. श्री सिद्धेश्वर गो - शाळेच्या आवारात गायींसाठी चारा साठवलेला होता. त्यामध्ये 3 टॅक्टर गवत, 2 टॅक्टर करड व 1 ट्रॅक्टर कडबा होता. तसेच 100 फुट पाण्याची पाईप, 4 तट व अनेक वस्तू आगीत भस्म झाले होते. त्यामुळे त्वरित मदत म्हणून मुतगा येथील श्री शिवाजी ओमाण्णा चौगुले व वि.हिं.प बजरंग दल मुतगा कार्यकर्त्यांकडून श्री सिद्धेश्वर गो-शाळेला भेट देऊन 2 ट्रॅक्टर चारा देण्यात आला.
यावेळी L.G Boys चे कार्यकर्ते श्री प्रमोद चौगुले, सागर पाटील व बजरंग दल प्रमुख गजानन बिरादार, सुरज पाटील व समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.
गो - शाळेच्या आवारात लागलेल्या आगीत गो - शाळेच्या 6 झाडेसुद्धा जळाली आहेत. अज्ञात समाजकंटानी ही आग लावल्याचा संशय आहे. आग लागताच स्थानिक लोकांनी पाण्याचा मारा करत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केल्याने मोठे नुकसान झाले आहे.
सध्या श्री सिद्धेश्वर गो - शाळेमध्ये 45 गायी आहेत. त्यामुळे, या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी श्री सिद्धेश्वर गो - शाळेच्यावतीने करण्यात आली आहे.
आर्थिक मदतीचे आवाहन : संपर्क हिरामनी मुचंडीकर - 8548046263

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : त्या गो-शाळेला केली मदत; लाखो रुपयांचे झालयं नुकसान

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm