बेळगावात शिवजयंती उत्साहात साजरी : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव;

बेळगावात शिवजयंती उत्साहात साजरी : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव;

belgavkar.com | belgaum | belgavkar

हिंदवी स्वराज्यामुळेच आपण हिंदू म्हणून जगतो : जिल्हाध्यक्ष श्री किरण गावडे

बेळगाव : दरवर्षी प्रमाणे यावर्षीही हिंदू तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीया (बुधवार 31 मार्च 2021) या दिवशी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रेरणा मंत्राने सुरुवात करून शिवछत्रपतींच्या मूर्तीला अभिषेक घालून जिल्हाध्यक्ष श्री किरण गावडे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यांनतर महिलांच्या वतीने पाळणा गीत म्हणण्यात आले. यावेळी शिवभक्त धारकर्यांना किरण गावडे यांनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज आपण जे काय हिंदू म्हणून जगतो आहोत ते आपल्या हिंदवी स्वराज्यामुळे. असं असताना आपण त्यांची जयंती सुद्धा ही हिंदू तिथीनुसारच केली पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी आहे. तसेच धर्मवीर बलिदान मास निमित्त आणि शिवजयंतीचे औचित्य साधून संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजन केले आहे. त्यासाठी आपण रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त महिला तसेच धारकरी उपस्थित होते.
यावेळी शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, अजित जाधव, पुंडलिक चव्हाण, कल्लापा पाटील, अंकुश केसरकर, किरण बडवाण्णाचे, गजानन पवार, अतुल केसरकर, व्यंकटेश पाटील, शंकर भातकांडे, आनंद कांबळे, गजानन पाटील, विजय कुंटे, सदानंद मजुकर, प्रमिला पाटील, पूजा किणेकर, श्रुती धारपवार तसेच मोठ्या संख्येने शिवभक्त आणि धारकरी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावात शिवजयंती उत्साहात साजरी : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव;
हिंदवी स्वराज्यामुळेच आपण हिंदू म्हणून जगतो : जिल्हाध्यक्ष श्री किरण गावडे

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm