बेळगाव : व्हॅक्सिन डेपोतून निघाला 15 पोती कचरा

बेळगाव : व्हॅक्सिन डेपोतून निघाला 15 पोती कचरा

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी व्हॅक्सिन डेपो परिसरात स्वच्छता मोहीम राबवून 15 हून अधिक पोती कचरा जमा केला. त्यात पाणी व मद्याच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या आदींचा प्राधान्याने समावेश होता. त्यानंतर या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॅक्सिन डेपो संवर्धन व स्वच्छतेचे आवाहन करण्यात येत आहे.
त्याला सुरवातीला अत्यल्प प्रतिसाद मिळायचा. परंतु, अलीकडे सर्व थरातून प्रतिसाद वाढतो आहे. सामाजिक कार्यकर्त्यांसह विद्यार्थी व पर्यावरणप्रेमी स्वच्छतेसाठी पुढे येत आहेत. स्वच्छता मोहिमेसाठी रविवारचा दिवस निश्चित करण्यात करण्यात आला आहे. त्यानुसार या रविवारीही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात 15 हून अधिक युवकांनी सहभाग घेतला होता. सर्वांनी मिळून 15 पेक्षा अधिक पोती कचरा जमा केला. दुपारपर्यंत राबविलेल्या या मोहिमेत पाणी व मद्याच्या बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या व अन्य कचरा जमा करण्यात आला.
कचरा जमा केल्यानंतर त्याचा व्हिडिओ व फोटो काढण्यात आले. ते फेसबुक, व्हॉट्सअँप आणि ट्विटरवर अपलोड करुन इतरांनाही या मोहिमेत सहभागी होण्याबाबत जागृती करण्यात आली. भविष्यातही परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून त्याबाबतची माहिती सोशल मीडियातून दिली जाणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : व्हॅक्सिन डेपोतून निघाला 15 पोती कचरा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm