बेळगाव : मगरीच्या पिल्लास दिले बजरंगी भाईजानने जीवनदान

बेळगाव : मगरीच्या पिल्लास दिले बजरंगी भाईजानने जीवनदान

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : काकती ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील हालभावी येथील शेतातील विहिरीत मगरीचे पिल्लू सापडले. 2019 मध्ये बेळगाव परिसरातील लोकांना दुष्काळाला सामोरे जावे लागले होते. या पावसात राकसकोप जलाशयातील एक मगर मार्कंडेय नदीतून वाहत वाहत काकती - होनगा परिसरात येऊन पोचलेले. साधारण गेली दीड वर्षे हे मगरी या परिसरात वास्तव्यास होते. नदीकाठी शेती असलेल्या शेतकऱ्यांना याचा खुप धोका होता. त्या मगरीने आता काही पिल्ले घातली होती. त्यातील एक पिल्लू बेळगावपासून साधारण 20 किलोमीटर वर असलेल्या हालभावी या गावात कन्हैया नावाच्या शेतकऱ्याच्या विहिरीत वास्तव्यास होते.
शेतातील विहिरीत मगरीचे पिल्लू पडल्याचे शेतकऱ्याला गुरुवारी निदर्शनास आले. त्याने लागलीच वनखात्याचे कर्मचारी आणि माझा धर्म प्राणी वाचवा संघटनेचे विनायक केसरकर (बेळगावचे बजरंगी भाईजान - अनेकांना त्यांनी आपल्या सुखरुप पाठविलेले आहे.) यांच्याशी संपर्क साधला. केसरकर यांनी धाव घेऊन मगरीच्या पिल्लाला काहीजणांच्या सहकार्यातून ताब्यात घेतले. त्याला वनखात्याच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. मगरीचे पिल्लू आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुळात आम्ही मानवच त्यांच्या घरावर कब्जा करत आहोत. मग ते कधीकधी रस्त्यावर येत आहेत आणि वाहनाखाली सापडून त्या प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे.तर काही प्राणी शेतात वगैरे येत आहेत आणि याचा शेतकऱ्यांना खूप त्रास होतो या सर्वाचं कारण जंगल तोड हेच आहे. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून विनायक केसरकर हे गेली काही वर्ष हे कार्य करत आहेत. त्यांनी सर्वांना एक आवाहन देखील केलेले आहे की कृपया जंगल तोड किंवा जंगलाची नासधूस करू नये. जर आपल्या आजूबाजूच्या परिसरात कोणत्याही प्रकारचा प्राणी आढळल्यास प्राणी बचाव दलास किंवा वन अधिकाऱ्यांना संपर्क करावे असे त्यांनी सांगितले

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : मगरीच्या पिल्लास दिले बजरंगी भाईजानने जीवनदान

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm