बेळगाव : आमचं काम बोलतं; हॉस्पिटलच्या आवारात स्वच्छता मोहीम;

बेळगाव : आमचं काम बोलतं;
हॉस्पिटलच्या आवारात स्वच्छता मोहीम;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव येथील बिम्सच्या (BIMS - सिव्हिल हॉस्पिटल) आवारात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा, कोरोना पीपीई कीट, बाटल्या, कचऱ्यासह अन्य कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. तरीही बिम्स प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले होते. याची दखल घेऊन हेल्प फॉर निडी आणि फेसबुक फ्रेंड सर्कल (Help for Needy & Facebook Friend Circle) या सामाजिक संघटनेच्यावतीने बिम्स आवारात स्वच्छता मोहीम राबविली.
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिसरात पसरलेल्या वैद्यकीय कचऱ्यासह प्लास्टिक बाटल्या, दारूच्या रिकाम्या बाटल्यांसह अन्य कचऱ्याची उचल केली. परिसरात वापरलेले मास्क, सलाईनच्या रिकाम्या बाटल्या, पीपीई किटसह शिल्लक राहिलेले अन्नही टाकण्यात आले होते. यामुळे अस्वच्छतेबरोबरच रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच हेल्प फॉर निडी संघटनेचे सुरेंद्र अनगोळकर, फेसबुक फ्रेंड सर्कचे संतोष दरेकर यांच्यासह संघटनेचे अन्य कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम राबविली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : आमचं काम बोलतं; हॉस्पिटलच्या आवारात स्वच्छता मोहीम;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm