बेळगाव : जेव्हा महिला घर सांभाळता सांभाळता मिळणार्या लहानश्या वेळेत आपल्या कलेला वा स्वतः च्या मनाला वेळ देऊ पाहतात, तेव्हा त्यांच्यातल स्त्रीयत्व बहरत, असे विचार माजी नगरसेविका वैशाली हुलजी यांनी व्यक्त केले. महाद्वार रोड, तिसरा क्राॅस येथील रखुमाई महिला मंडळ व माऊली महिला मंडळाच्या महिला दिन कार्यक्रमात बोलत होत्या.
याप्रसंगी अध्यक्ष स्थानी पुष्पलता जोशीलकर होत्या. प्रारंभी आरती पाटील, सुमन सांबरे, सुरेखा शिंदे, विद्या जाधव यांनी इशस्तवन गीत सादर केले. पाहुण्यांचा परिचय रेखा मण्णूरकर यांनी करून दिला. यावेळी गरजू महिलांना गृहोपयोगी साहित्य देण्यात आले. आभार सुजाता शिंदे यांनी मानले.