बेळगाव : गडाला पुनर्वैभव मिळवून गडाचे गडपण जपणार;

बेळगाव : गडाला पुनर्वैभव मिळवून गडाचे गडपण जपणार;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : चंदगड आणि बेळगावचे काही दुर्गवीर प्रत्येक रविवारी कलानिधीगडावर (ता. चंदगड) श्रमदान मोहीम करतात. या दुर्गवीरांनी अनेक पडझड झालेल्या वास्तू सुस्थितीत आणल्या आणि या गडाला गडपण दिल आहे. अशीच एक मोहिम झाली 14 मार्च रोजी झाली आहे. या मोहिमध्ये अनेक नवे चेहरे, नवे दुर्गवीर सामील झाले आणि मोहीम यशस्वी केली. सध्याची मोहीम गणेश दरवाजा जवळ चालू आहे.
गडदुर्ग म्हणजे स्वराज्याची ताकद...
गडदुर्ग म्हणजे मावळ्यांचा पाठीराखा आणि दुर्गवीर म्हणजे आजच्या घडीला या गडदुर्गाचे रक्षणकर्ते... विशेष म्हणजे दुर्गवीर प्रमुख संतोष दादांच मार्गदर्शन या मोहिमेला लाभलं तसेच दादांनी सर्व जुन्या नव्या चेहऱ्यांशी संवाद साधला.
आगामी काळात प्रत्येक रविवारी होणाऱ्या या मोहिमांमध्ये ज्या शिवभक्तांना सामील व्हायचं असेल किंवा ज्यांना या मोहिमेत सामील होता येत नसेल पण आर्थिक स्वरूपात काही मदत करायची असेल तर त्यांनी दुर्गवीर प्रतिष्ठान शी संपर्क करावा.
संपर्क : संदिप गावडे - 9870101231
अभिजित अष्टेकर - 9740103131
अजित पाटील - 9011376230
दिगंबर भाटे - 9075979813

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : गडाला पुनर्वैभव मिळवून गडाचे गडपण जपणार;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm