बेळगावचा ‘बजरंगी भाईजान’ पार्ट 2; कहाणी प्रत्यक्षात; युवकाच्या बाबतीत काय घडले...?
झारखंडचा व्यक्ती, बेळगावचा बजरंगी भाईजान (विनायक केसरकर -Photo दोन नंबर युवक) आणि विनायकचे सहकारी

बेळगावचा ‘बजरंगी भाईजान’ पार्ट 2;
कहाणी प्रत्यक्षात;
युवकाच्या बाबतीत काय घडले...?

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : एखाद्या व्यक्तीने इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटी ठेवली तर काय शक्‍य होऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे बेळगावचे कराटे व नृत्य प्रशिक्षक विनायक केसरकर. अभिनेता सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' हा चित्रपटाची आठवण व्हावी, अशी घटना प्रत्यक्षात पहिल्यांदा नाहीतर दुसर्‍यांदा घडली आहे. काही लोकांनी झारखंडच्या एका व्यक्तीला नोकरीच्या आमिषाने बेळगावला आणले, पण जेंव्हा तो बेळगावला येत होता तेव्हा त्याला त्या लोकांनी लुटले. मग त्या व्यक्तीला आता बेळगावात काय करायचे काही सुचेना. मग तो इकडे तिकडे भटकू लागला होता. अशा वाईट अवस्थेत त्या व्यक्तीला राहुल गोडसे आणि हॉटेल सलीम वाले यांनी त्याला पाहिले. त्याला मदतीसाठी विचारले, त्यांनी त्या व्यक्तीची सर्व माहिती घेतली. त्यांनी पोलीस स्टेशनला गेले आणि पोलिसांना विनंती केली की त्या व्यक्तीला त्याच्या घरापर्यंत पोहोचवावे.
मग पोलिसांनी त्यांना सांगितले की त्याला ते पोहचवू शकतात. पण प्रक्रिया जी होती ती खूप विलंब लावणारी होती. तेंव्हा त्यांनी त्यांचा निर्णय बदलला. मग त्यांना आठवला तो बेळगावचा बजरंगी भाईजान (विनायक केसरकर). ज्यांनी काही दिवसापूर्वी एका नेपाळी व्यक्तीला बेळगावातून नेपाळपर्यंत जाण्यास मदत केली होती. लगेचच त्यांनी विनायक केसरकर यांच्याशी संपर्क केला. मग विनायक केसरकर यांनी त्याची जबाबदारी घेतली. त्यांनी त्याची चौकशी केली व पडताळणी केली की, खरंच त्याला मदतीची गरज आहे का.? मग तो गरजू व्यक्ती बोलला की मी इथे मिळेल ते काम करेन आणि कमवून मी माझ्या घरी जाईन. तेव्हा त्याला एका स्थानिक दुकानात काम दिले. तिथे त्याने थोडे पैसे कमावले. त्या व्यक्तीचा प्रामाणिकपणा पाहता विनायक केसरकर यांनी लवकरच काही रक्कम जमा केली आणि त्याची जाण्याची व्यवस्था केेली. झारखंड पर्यंत थेट गाडी नसल्याकारणाने त्याला पुणे येथे पोचवण्यात आले.
पुण्यात संतोष पेटकर यांनी त्याची नागपूर पर्यंतची बसणे जाण्याची व्यवस्था केली. नागपुरात कुमारी मिनूश्री महेंद्रकुमार रावत यांनी त्याची राहण्याची व्यवस्था आपला भाऊ श्री.अंकित साकोरे यांच्या घरी केली. नागपूर हुन झारखंड पर्यंत जाण्याची व्यवस्था अंकित साकोरे यांनी केली.bअशा पद्धतीने सर्वांच्या मदतीने तो व्यक्ती त्याच्या घरी 15 मार्च 2021 च्या मध्यरात्री पोहोचला. सर्वांनी माणुसकीच्या नात्याने विनायक केसरकर यांना त्या झारखंडच्या व्यक्तीला पोहोचविण्यात मदत केली. विनायक केसरकर हे अशा बेघर झालेल्या आणि फसलेल्या लोकांना त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्याचे कार्य किंवा त्यांना आसरा मिळवून देण्याचे कार्य करत आहेत.
बेळगावचा ‘बजरंगी भाईजान’ पार्ट 1;
नेपाळच्या बिकास थापा या युवकाला बेळगावकराने नेपाळच्या ताब्यात दिले आहे. बेंगलोर येथे लुबाडणूक झाली असल्यामुळे असहाय्य अवस्थेत बेळगाव शहरानजीकच्या बर्डे पेट्रोल पंपनजीक बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या नेपाळ देशातील एका इसमाला त्याच्या मायदेशी सुखरूप पोहोचविण्याची कामगिरी प्रशिक्षक विनायक केसरकर यांनी बजावली आहे. याबाबतची माहिती अशी की, बर्डे पेट्रोल पंप येथून जात असताना विनायक केसरकर यांना 31 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 2 च्या सुमारास रखरखत्या उन्हात पेट्रोल पंप जवळ एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत नजरेस आली. बेशुद्ध अवस्थेतील त्या व्यक्तीच्या आसपास दुर्गंधी पसरली होती. तेव्हा केसरकर यांनी पुढाकार घेऊन त्या व्यक्तीची शारीरिक स्वच्छता केली. त्या मूकबधिर व्यक्तीकडून विनायक केसरकर यांनी त्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा त्याच्याकडे पिशवीत कांही महत्वाची कागदपत्रे होती. त्यावरून असे समजले की ती व्यक्ती नोकरी निमित्त बेंगळूर येथे आली होती तेथे काही गुंडांनी त्यांना मारहाण केली आणि त्याच्याकडील पैसे वगैरे चोरले. यामध्ये महत्वाची कांही कागद पत्रे देखील चोरीला गेली होती.
या पद्धतीने लुबाडणूक झाल्यामुळे संबंधित व्यक्ती बेंगळूरहुन बेळगावपर्यंत चालत येऊन बर्डे पेट्रोल पंपनजीक बेशुद्ध होऊन पडली. त्यावेळी विनायक केसरकर यांनी दुपारी 4 च्या सुमारास काकती येथे एका खोलीत त्या व्यक्तीला आश्रय मिळवून दिला. त्यांच्याकडून त्याच्या मूळ गावाची व नावाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याचे नाव बिकास थापा असे असल्याचे समजले. भारतातील सर्व शहरांची नांवे घेतल्यावर शेवटी काठमांडू या शहराचे नाव घेताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. विनायक केसरकर यांना नेपाळमधील काही गावांची माहिती होती ती त्यांनी वदली तेंव्हा त्याने कांही इशारे केले. पालिया, गौरिखंडा, धनगडी अशी नांवे घेतल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
आता खरी कसोटी होती ती त्याला नेपाळपर्यंत पोहचवण्याची. काही लोकांच्या मदतीने भारतीय रेल्वेचे तिकीट भेटले. त्यांचा पाहुणचार करून 1 जानेवारी 2021 रोजी संध्याकाळी ठीक 8 वाजता गोवा एक्स्प्रेस या रेल्वेत बिकास थापा याला बसविण्यात आले. ही रेल्वे 3 जानेवारी 2021 रोजी सकाळी पहाटे ठीक 6 वाजता दिल्ली येथे पोहचली. विनायक केसरकर हे कराटे आणि नृत्य शिक्षक असल्याकारणाने त्यांचे दिल्ली येथे काही शिष्य आहेत. त्यांनी तेथून त्या अनोळखी व्यक्तीसोबत स्वतः बसने प्रवास करत 4 जानेवारी 2021 रोजी भारत आणि नेपाळ सीमेवर पोलिसांच्या हवाली केले. अशारितीने विदेशी पिडीताला मायदेशी पोहचविण्यात केसरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले. या कार्यात विनायक केसरकर यांना गणेश थापा, चेतन डीगल, अनिस सौदागर, सुरेश ओखेडा, महेंद्र सिंग, शिवाजी कडोलकर, मदन भट व आशिष नेपाली यांनी मदत केली होती.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावचा ‘बजरंगी भाईजान’ पार्ट 2; कहाणी प्रत्यक्षात; युवकाच्या बाबतीत काय घडले...?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm