बेळगाव : Welcome वाघ, बिबट्या, सांबर आणि तरस

बेळगाव : Welcome वाघ, बिबट्या, सांबर आणि तरस

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : म्हैसूर प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर बेळगाव तालुक्यातील भुतरामहट्टी येथील वीर कितूर राणी चन्नम्मा प्राणिसंग्रहालयाचा विकास करण्यात येणार आहे. 34 एकर परिसरात पसरलेल्या पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग 4 व बेळगाव शहरालगत असलेल्या भुतरामहनहट्टी येथील या प्राणी संग्रहालयात 3 सिंह दाखल झाले आहेत. त्यानंतर आता या प्राणी संग्रहालयात वाघ, बिबट्या, सांबर (हरण) आणि जंगली तरस हे प्राणी आणण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्राणी संग्रहालयात आता वाघांचीही डरकाळी घुमणार आहे. प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांना आता वाघांचं दर्शन घडणार आहे.
वाघ आणि बिबट्यांसाठी निवारा शेड उभारण्यात आले आहेत. या प्राणी संग्रहालयात पर्यटकांसाठी शॉपिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. या प्राणी संग्रहालयाचा तब्बल 50 कोटी निधीतून विकास करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात तीन सिंह आणण्यात आले असून येत्या आठवडाभरात म्हेसूर पार्कमधून वाघ आणि बिबटे दाखल होणार आहेत. हे प्राणी संग्रहालय म्हैसूर झूच्या धर्तीवर राष्ट्रीय पातळीवरील पर्यटन केंद्र करण्यात येणार आहे.
Lions already arrived @BelagaviZoo, now it's time to welcome #tigers, #leopard #sambardeer #hyaena from @Mysore_Zoo
याबाबतची माहिती Zoos of Karnataka ने दिली आहे.
संग्रहालयात पाण्याची आवश्यकता असून, यासाठी तलाव भरण्याची योजना सुरू आहे. प्रत्येकी 20 रुपये असलेला तिकीट दर 40 रुपये करण्यात येणार आहे. शालेय सहलींसाठी सवलतीच्या दरात तिकीट दर आकारण्यात येणार आहे. या संग्रहालयातील प्राण्यांसाठी दत्तक योजना राबविण्यात येणार असून त्यामुळे संग्रहालयाचा विकास होण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात म्हैसूर पार्कमधील प्रेक्षा - गणेशाच्या पोटी 12 फेब्रुवारी 2010 ला जन्मलेल्या तीन सिंहाना (दोन नर - Nakul, Krishna आणि एक मादी - Nirupama) प्राणि संग्रहालयात आणण्यात आले आहे.
34 एकर परिसरात पसरलेल्या या मिनी झू (प्राणी संग्रहालय) मध्ये अनेक प्राणी व पक्षी आहेत. परंतु वाघ व सिंह यासारख्या प्राण्यांना ठेवण्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची गरज लागते. त्यामुळे आता परवानगी मिळाल्याने टायगर सफारीचा मार्ग मोकळा झाला. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार टायगर सफारी आणि टायगर घर निर्मितीची योजना अंतिम टप्प्यात आहे. टायगर सफारी करण्यासाठी मोठे अरण्य किव्हा मोठ्या प्राणिसंग्रहालयात जावे लागत असते. पण आता या प्राणी संग्रहालयातील वाघांमुळे बेळगावच्या नागरिकांना लवकरच टायगर सफारीचा आनंद घेता येणार असून त्यांचे टायगर सफारीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय महामार्गाला लागूनच प्राणीसंग्रहालय असल्याने पर्यटकांची संख्या नक्कीच वाढेल. वन विभागाने पाठविलेल्या प्रस्तावाला केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने अनुमती दिल्याने वाघ लवकरच दाखल होणार आहेत. या प्राणी संग्रहालयात वाघ, सिंह, अस्वल, बिबट्या, सांबर, तरस, कोल्हा यासह इतर प्राणी व पक्षी ठेवण्याची परवानगी दिली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : Welcome वाघ, बिबट्या, सांबर आणि तरस

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm