बेळगावात होणार सैनिक स्मारक; गोगटे सर्कल उद्यानाचा विकास

बेळगावात होणार सैनिक स्मारक;
गोगटे सर्कल उद्यानाचा विकास

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : गोगटे सर्कल उद्यानाचा सैनिक स्मारक म्हणून विकास होणार आहे. आमदार निधी, महापालिका व स्मार्टसिटीतून सुमारे 5 कोटी रुपये खर्चातून हा विकास केला जाणार असल्याची माहिती आमदार अनिल बेनके यांनी दिली. रेल्वे स्टेशन च्या समोर असलेल्या गोगटे चौकातील सूर्यकांत पार्क / उद्यानाचा विकास करण्यात येणार आहे. आमदार बेनके कॅण्टोन्मेंट बोर्डाकडे उद्यान विकासासाठी पाठपुरावा करत होते. कॅण्टोन्मेंटकडून ना - हरकत पत्र मिळत नसल्याने अडचणी येत होत्या. मात्र, दोन महिन्यांपूर्वी याबाबतचे ना हरकत पत्र दिले होते. त्यामुळे, उद्यानाची स्वच्छता केली. उद्यानात टँक, जहाज व विमानाच्या प्रतिकृती ठेवण्यात येणार आहे. कारंजेही उभारले जाणार आहे.
आमदार बेनके, स्मार्टसिटी एमडी शशीधर कुरेर, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ बर्चस्वा व महापालिका अधिकाऱ्यांनी उद्यानाची पाहणी केली. यासंबंधी आमदार बेनके यांनी स्मार्ट सिटी व महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. महापालिकेने उद्यान विकासाचे 3 आराखडे तयार केले असून यातील एक आराखडा अंतिम असेल. आराखडे स्मार्ट सिटी एमडींना दाखविले. आता जागा विकासाला देण्याचा मार्ग मोकळा झाला असून या ठिकाणी भारतीय सेना, वायुसेना, जलसेना या तिन्ही सेनातील सैन्यात वापरण्यात येणाऱ्या वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आ. बेनके यांनी दिली. भारतीय सेनाचा इतिहास प्रेरणादायी ठरणार असून रणगाडे, लढाऊ विमाने, बोटी पाहावयास मिळणार आहेत. या उद्यानाचा विकासकरण्यासाठी आतापर्यंत पाच वेळा पाहणी करण्यात आली आहे.
मराठा लाईट इंन्फंट्री व सैनिकी पराक्रमाची माहिती सांगणारे प्रदर्शन.
उद्यानात तोफा व रणगाडे
उद्यानाच्या मध्यभागी फाउंटेन कारंजा
मराठा लाईट इन्फंट्रीच्या सहकार्याने विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. विद्यार्थी व शहरवासियांना तिन्ही (भू - वायू - सेना) दलाविषयी माहिती मिळावी यासाठी विमान, टँक व जहाजाची प्रतिकृती उभारण्यात येणार असल्याची माहितीही आमदार बेनके यांनी दिली. गोगटे सर्कल येथील सूर्यकांत पार्क उद्यानाचे सैनिक स्मारकामध्ये रूपांतर करण्याची योजना गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. या स्मारकासाठी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक होते. त्याला बोर्डाने हिरवा कंदील दिला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावात होणार सैनिक स्मारक; गोगटे सर्कल उद्यानाचा विकास

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm