बेळगाव : येथे 7 फूटांचा अजगर पकडला VIDEO

बेळगाव : येथे 7 फूटांचा अजगर पकडला VIDEO

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : साप साधा दिसला तरीही अनेकांची भंबेरी उडते. मग अशावेळी शांत राहण तर सोडाच पण त्याठिकाणावरून पळून जाणं अनेक जण पसंत करतात. अशावेळी विचार करा तुमच्या आजुबाजुला अजगर साप आढळून आला तोही 'भलामोठा पायथॉन' तर एखाद्याची काय अवस्था होईल? आरडाओरड करुन एखादा माणूस घर डोक्यावर घेईल. पण एवढा मोठा पायथॉन पाहूनही हा माणूस शांत आहे. बेळगाव तालुक्यातील अलारवाड गावामध्ये भलामोठा अजगर साप आढळून येतो. तर हा माणूस म्हणजेच प्रसिद्ध सर्पमित्र आनंद चिठ्ठी शांतपणे त्या सापाला उचलतो आणि त्याला पकडतो.
अलरवाड येथील शेतकरी शंकर गौडा यांच्या घरासमोर साप असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तातडीने सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांच्याशी संपर्क साधला. सर्पमित्र आनंद यांनी तातडीने बुधवारी रात्री लाकडाच्या ढिगाऱ्यात बसलेल्या अजगरला शांततेत ताब्यात घेतले. हा अजगर 'मादी' जातीचा असून त्याची लांबी 7 फूट 3 इंच आहे तर वजन 14 किलो असून वय अंदाजे 4 वर्ष आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : येथे 7 फूटांचा अजगर पकडला VIDEO

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm