बेळगाव : 2 कोटी रुपयांची फेलोशिप

बेळगाव : 2 कोटी रुपयांची फेलोशिप

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. निपाणी : अलीकडच्या काळात शिक्षणाचे बाजारीकरण होत असल्याने सर्वसामान्य कुटुंबातील मुलांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत लखनापूर (ता. निपाणी) येथील सुरेंद्र रामचंद्र चौगुले या रिक्षाचालकाच्या मुलाने जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित 'मैरी स्कोलोडोव्स्की क्युरी अॅक्शन्स' ही तब्बल 2 कोटी रुपयांची वैयक्तिक फेलोशिप पटकावली आहे. प्रा. डॉ. संदेश चौगुले असे या संशोधकाचे नाव आहे. ते राजस्थानमधील जयपूरच्या 'द एलएनएम इन्स्टिट्यूट ऑफ इंफार्मेशन टेक्नालॉजीमध्ये' सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांच्या या यशामुळे निपाणी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ही शिष्यवृत्ती मिळविणारे ते महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील पहिले मानकरी ठरले आहेत.
प्रा. डॉ. संदेश चौगुले यांची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच आहे. त्यामुळे वडील सुरेंद्र हे रिक्षा व्यवसाय तर आई मंगला या शिवणकाम करतात. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोगनोळी, कागल व अर्जुननगर (ता. कागल) तर महाविद्यालयीन शिक्षण देवचंद कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर कराड येथील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. ई. आणि एम. टेक. पदवी घेतली. त्यानंतर विविध क्षेत्रात संशोधन करण्यासाठी त्यांनी अनेक पर्याय निवडले. 'नॅनो फ्लूड स्पेक्ट्रल बिम स्पिल्टिंग अस्सिटेड कॉन्सेंट्रिक फोटोओल्टाइक कलेक्टर' या विषयावर शोधप्रबंध दिला. त्यासाठी युरोपियन कमिशनकडून 2 कोटींची फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे. या फेलोशिप अंतर्गत जगातील सर्वोच्च विद्यापीठांची आठवी संस्था असलेल्या जगप्रसिद्ध इम्पिरियल कॉलेज-लंडन येथे संशोधन करता येणार आहे.
'नेनोफ्लॉइड स्पेक्ट्रल बीम स्प्लिटिंग असिस्टेंट कॉन्ट्रिक फोटोव्होल्टेइक कलेक्टर्स' वर संशोधन करणार आहेत. कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात असताना त्यांना नॅनोफ्लॉईड्सच्या संशोधनात रस निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंदौर येथून अडीच वर्षांत पीएच. डी. पदवी मिळविली. गेली 6 वर्षे जयपूरच्या द एलएनएम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते सध्या अनेक पीएच. डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांना भारत सरकारकडून संशोधन अनुदानही मिळाले आहे. गेल्या वर्षी त्यांना आयएसटीई यंग रिसर्चर अवॉर्ड मिळाले आहे. कराड येथील प्राचार्य डॉ. अशोक पिसे व जयपूर येथील द एलएनएम आयआयटीचे राहुल बॅनर्जी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल निपाणी तालुक्यात त्यांचे कौतूक होत आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 2 कोटी रुपयांची फेलोशिप

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm