बेळगाव : हेस्कॉम | पुन्हा जनतेला दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता

बेळगाव : हेस्कॉम | पुन्हा जनतेला दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : वीज दरवाढ होऊन तीन महिनेही उलटलेले नसताना हेस्कॉमने वीज नियामक आयोगापुढे (केईआरसी) पुन्हा दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. याबाबतची प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करुन एप्रिलपासून पुन्हा दरवाढीचा शॉक बसणार आहे. वर्षभरात वीज दरवाढीचा दुसरा प्रस्ताव हेस्कॉमने Karnataka Electricity Regulatory Commission कडे पाठवला आहे. त्यामुळे शहराबरोबर ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्राहकांना देखील फटका बसणार आहे. प्रतियुनिट 75 पैशांनी वाढ करावी, अशी मागणी प्रस्तावात केली आहे . केईआरसीने दरवाढ करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यास वाढत्या महागाईत शॉक बसण्याची शक्यता आहे. यामुळे आधीच आर्थिक संकटात असणाऱ्या नागरिकांना हेस्कॉमसह वीज वितरण कंपन्यांनी झटका दिला आहे.
हेस्कॉमला 8915.95 कोटी रुपये महसूल मिळणार आहे. पण, प्रत्यक्षात 10028.32 कोटींचा महसूल अपेक्षित असून 1112.37 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
घरगुती विजजोडणी : शहर
युनिट सध्याचे दर सुधारित दर
1 ते 30 3.95 4.68
31 ते 100 5.45 6.18
101 ते 100 7.00 7.73
200 युनिटनंतर 8.05 8.78

हेस्कॉमने घरगुती वीज वापराकरिता प्रतियुनिटसाठी 3.95 पैशांवरुन 4.68 रुपये दर देण्याची मागणी केली आहे. गेल्या दोन वर्षांतील आकडेवारीनुसार 974 कोटींचा तोटा झाल्याचे हेस्कॉमने प्रस्तावात म्हटले ओह. काही दिवसांपूर्वी झालेल्या वीज दरवाढीत प्रति युनिट दर 3 रुपयावरुन 3.94 रुपये वाढवला आहे. तो दर 4.68 रुपये करण्याची मागणी हेस्कॉमने केली आहे. ग्रामीण भागात सद्याचा दर 3.85 रुपये असून तो 4.58 रुपये होण्याची शक्यता आहे.
घरगुती विजजोडणी : ग्रामीण
युनिट सध्याचे दर सुधारित दर
1 ते 30 3.85 4.58
31 ते 100 5.15 5.88
101 ते 100 6.70 7.43
200 युनिटनंतर 7.55 8.28

हेस्कॉमने औद्योगिक वीज वापराकरिता प्रति युनिटसाठी 8.25 पैशांऐवजी 8.98 पैसे दर देण्याची मागणी केली आहे. कोरोनामुळे आधीच आर्थिक चणचणीत असणाऱ्या सामान्य नागरिकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. नोकरदारवर्गही अडचणीत सापडला आहे. आगामी काळात होणाऱ्या वीज दरवाढीमुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
व्यावसायिक दर
युनिट सध्याचे दर सुधारित दर
1 ते 200 7.15 7.88
200 युनिटनंतर 8.40 9.13

तसेच 1 एप्रिल 2021 पासून पुन्हा नवे वीजदर लागू होतील. यामुळे एप्रिलपासून ग्राहकांना वाढीव बील भरावे लागण्याची शक्यता आहे. अलिकडेच हेस्कॉमने वीज दरवाढ केली होती. युनिटमागे 4 रुपये वीज दरवाढ झाली असून कोरोना काळात ग्राहकांना वीज दरवाढीचा फटका बसल्याने आर्थिक चणचणीत भर पडली आहे. आता पुन्हा एकदा वीज दरवाढीचा प्रस्ताव तयार झाला असून लवकरच प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. वीज वितरण व्यवस्थेसाठी येणारा खर्च मोठा आहे. त्यामुळे जुळवाजुळव करताना अडचणी येत आहेत. आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे कारण हेस्कॉमने दिले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : हेस्कॉम | पुन्हा जनतेला दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm