बेळगाव : केएलई हॉस्पिटलमध्ये मेंदूवर अवघड शस्त्रक्रिया

बेळगाव : केएलई हॉस्पिटलमध्ये मेंदूवर अवघड शस्त्रक्रिया

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये एका 50 वर्षांच्या रुग्णाच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान देण्यात आले. वैद्यकीय भाषेत व्हेरिओ गायडेड बायोप्सी (Vario Guided Biopsy) अशा स्वरुपाची ही शस्त्रक्रिया होती. मनुष्याच्या मेंदूच्या अगदी आतील भागास बारीकशी गाठ आल्याने सदर रुग्णाला डोकेदुखी, बोलण्यात अडथळा आणि अशक्तपणा अशी लक्षणे जाणवत होती.
एमआरआय केल्यानंतर त्याच्या मेंदूच्या आतील बाजूला गाठ आल्याचे आढळून आले. हॉस्पिटलच्या न्युरो सर्जरी विभागाच्या डॉक्टरांनी बायोप्सी पद्धतीने ही गाठ काढण्याचा निर्णय घेतला. ही अत्यंत अवघड आणि कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया होती. अत्यंत बारीक अशी सुई कवटीद्वारे मेंदूच्या त्या गाठीपर्यंत पोहोचून बायोप्सी करण्यात आली. यासाठी डॉ. प्रकाश महंतशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी डॉ. अभिषेक पाटील, डॉ. विक्रम टी. पी. व डॉ. प्रकाश राठोड यांनी ही बायोप्सी पूर्ण केली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : केएलई हॉस्पिटलमध्ये मेंदूवर अवघड शस्त्रक्रिया

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm