बेळगाव : नकुल, कृष्ण आणि निरूपमा लवकरच बेळगावला

बेळगाव : नकुल, कृष्ण आणि निरूपमा लवकरच बेळगावला

belgavkar.com | belgaum | belgavkar

भुतरामहट्टी प्राणिसंग्रहालयाचा विकास;
लवकरच वाघ, सिंह, हरीण, अस्वल, जिराफ

बेळगाव : म्हैसूर प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर बेळगाव तालुक्यातील भुतरामहट्टी येथील राणी कित्तूर चन्नम्मा प्राणिसंग्रहालयाचा विकास करण्यात येणार आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग 4 व बेळगाव शहरा लगत असलेल्या भुतरामहनहट्टी येथील वीर कितूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात कोरोनामुळे इतर प्राणी आणण्यासाठी विलंब झाला होता. आता या प्राणिसंग्रहालयात लवकरच नकुल, कृष्ण आणि निरूपमा हे सिंह लवकरच दाखल होणार आहेत. याबाबतची माहिती Zoos of Karnataka ने दिली आहे.
Zoos of Karnataka
Nakula , Krishna & Nirupama born to Preksha - Ganesha, on 12.2.2010 have been transported to Bhuthramanahatti zoo popularly known as #Belgaumzoo Animal lovers of region would get an opportunity to view the animals soon.
प्रेक्षा - गणेशाच्या पोटी 12 फेब्रुवारी 2010 ला जन्मलेल्या या तिन्ही सिंहाना (दोन नर - Nakul, Krishna आणि एक मादी - Nirupama) भुतरामहट्टी येथील राणी कित्तूर चन्नम्मा प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात येणार आहे. म्हैसूर प्राणीसंग्रहालयाप्रमाणे याचा विकास करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी वन्यजीव व पर्यावरण विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे भुतरामहनहट्टी प्रमुख अभयारण्य ठरणार आहे. सिंह, वाघ, अस्वलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.
34 एकर परिसरात पसरलेल्या या मिनी झू (प्राणी संग्रहालय) मध्ये अनेक प्राणी व पक्षी आहेत. परंतु वाघ व सिंह यासारख्या प्राण्यांना ठेवण्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची गरज लागते. त्यामुळे आता परवानगी मिळाल्याने टायगर सफारीचा मार्ग मोकळा झाला. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार टायगर सफारी आणि टायगर घर निर्मितीची योजना अंतिम टप्प्यात आहे. टायगर सफारी करण्यासाठी मोठे अरण्य किव्हा मोठ्या प्राणिसंग्रहालयात जावे लागत असते. पण आता या प्राणी संग्रहालयातील वाघांमुळे बेळगावच्या नागरिकांना लवकरच टायगर सफारीचा आनंद घेता येणार असून त्यांचे टायगर सफारीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय महामार्गाला लागूनच प्राणीसंग्रहालय असल्याने पर्यटकांची संख्या नक्कीच वाढेल. वन विभागाने पाठविलेल्या प्रस्तावाला केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने अनुमती दिल्याने 4 वाघ लवकरच दाखल होणार आहेत. या प्राणी संग्रहालयात वाघ, सिंह, अस्वल, बिबट्या, कोल्हा यासह इतर प्राणी व पक्षी ठेवण्याची परवानगी दिली आहे. कर्नाटक राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरणातर्फे याबाबतची अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली.
वाघ तसेच सिंह यांना राहण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या निवारा शेडचे काम पूर्ण होत आले आहे. जागेअभावी हत्ती, गेंडा असे मोठे प्राणी ठेवले जाणार नाहीत. या ठिकाणी इतर वन्यप्राणी आणणे आवश्यक होते. मात्र, कोरोनामुळे अडथळा निर्माण झाला आहे. यासाठी 2 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले असल्याचेही आमदार सतिश जारकीहोळींनी याअगोदरच सांगितले आहे. या प्राणी संग्रहालयात वाघ, सिंह, हरीण, अस्वल, जिराफ यासह इतर प्राणी आणण्यात येणार आहेत.
प्राणी संग्रहालयात पाण्याची आवश्यकता असून, यासाठी तलाव भरण्याची योजना सुरू आहे. प्राणी संग्रहालयासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. मृगालयासाठी तलाव भरणीचे काम सुरु करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांमध्ये वन्य प्राणी आणि पर्यावरणासंदर्भात जागृती करण्याची अत्यंत गरज आहे. वनखात्याकडून सुसज्जित प्राणी संग्रहालय निर्माणकार्य सुरू आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. या माध्यमातून जिल्ह्यात प्रवाशांची संख्या वाढणार आहे, असे जारकीहोळी यांनी सांगितले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : नकुल, कृष्ण आणि निरूपमा लवकरच बेळगावला
भुतरामहट्टी प्राणिसंग्रहालयाचा विकास; लवकरच वाघ, सिंह, हरीण, अस्वल, जिराफ

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm