बेळगाव : क्वॉरी आणि जिलेटिन कांड्यांचा स्फोटानंतर पोलिसांची खबरदारी; कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचे निर्देश

बेळगाव : क्वॉरी आणि जिलेटिन कांड्यांचा स्फोटानंतर पोलिसांची खबरदारी;
कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचे निर्देश

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : शिमोगा आणि चिक्कबळ्ळापूर येथे क्वॉरीत स्फोट होऊन जिवीतहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जिलेटीन व ईतर स्फोटक स्वरुपाच्या घटना बेळगाव जिल्ह्यात घडणार नाहीत, त्याची दक्षता घ्यावी. बेकायदा क्वॉरीसह स्फोटक साहित्य वाहतुकीवर लक्ष ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिले. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात बुधवारी (24 फेब्रुवारी) आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुख्य उद्देश स्फोटक साहित्य वाहतूक रोखणे आणि बेकायदा क्वॉरींचा तपास लावणे आहे. कोठे विनापरवाना क्वॉरी सुरु असल्यास त्या जप्त केल्या जाव्यात. जिवीत हानी होईल, या स्वरुपाच्या स्फोटक वस्तूंची वाहतूक होणार नाही, त्याची दक्षता घेतली जावी.
कर्नाटक राज्यात स्फोटक मॅगनिजची वाहतूक सुरु असल्याचे पुढे आले आहे. यापुढे या स्वरुपाच्या स्फोटक वस्तूंची वाहतूक होणार नाही, त्याची दक्षता घ्यावी. बेकायदा क्वॉरी उद्योग सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचा अहवाल संग्रहित करून मार्चअखेर तो सादर करावा. दर महिन्याला बैठक घ्यावी. सर्व विभाग अधिकाऱ्यांनी माहितीची देवाण - घेवाण करावी. वन क्षेत्रामध्ये नियमबाह्य क्वॉरी उद्योग चालणार नाही, त्याची दक्षता घेतली जावी. वाळू वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनामध्ये जीपीएस बसवावे.
गोकाक आणि सत्तीगेरीला नियमबाह्य क्वॉरीचा व्यवसाय सुरु असल्याची माहिती आहे. संयुक्त पथकांनी तेथे भेट देऊन कारवाई करावी, अशी सूचना निंबरगी यांनी केली. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षत अमरनाथ रेड्डी, भू आणि खाण, वन विभाग, अग्नीशामक दल, पर्यावरण नियंत्रण अधिकारी, सार्वजनिक बांधकाम अधिकारी आणि जिल्ह्यामधील सर्व सीपीआय बैठकीला उपस्थित होते.
कर्नाटक राज्यातील येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारवर तीव्र हल्ला चढवत विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी चिक्कबळ्ळापूर जिलेटीन स्फोट घटनेची न्यायालयीन चौकशीची मागणी केली. सिद्धरामय्या म्हणाले, की राज्यातील अवैध उत्खनन कायदेशीर करण्याच्या प्रयत्नांमुळेच मंगळवारच्या स्फोटात लोकांचा बळी गेला. जिलेटिन काड्यांच्या स्फोटामुळे 6 जणांना आपला जीव गमवावा लागला नाही, तर येडियुरप्पा प्रशासनाच्या गैरकारभारामुळे त्यांना प्राण गमवावा लागला, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : क्वॉरी आणि जिलेटिन कांड्यांचा स्फोटानंतर पोलिसांची खबरदारी; कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचे निर्देश

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm