बेळगाव : रेड्याला तब्बल 61 लाखांची मागणी

बेळगाव : रेड्याला तब्बल 61 लाखांची मागणी

belgavkar.com | belgaum | belgavkar

रेडा ठरला आकर्षण;
हा आहे 61 लाखांचा रेडा 'गजेंद्र';

बेळगाव - कागवाड : रेड्याची किंमत तब्बल 61 लाख?... आश्‍चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. मंगसुळी (ता. कागवाड) येथे आणण्यात आलेला तब्बल सव्वा टन वजनाचा गजेंद्र हा रेडा सर्वांचे आकर्षण ठरत आहे. येथील शेतकरी विलास गणपती नाईक (कारीमठ) यांच्या रेड्याला पाहण्यासाठी परिसरातील लोकांची मोठी गर्दी होत आहे. यारेड्याचे वय 3 वर्षे 1 महिना आहे. रोज 10 लिटर दूध पिणाऱ्या रेड्याचे नाव गजेंद्र आहे.
तासगाव (सांगली, महाराष्ट्र) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व क्रांतिसिंह नाना पाटील सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय शिवार कृषी प्रदर्शनात 61 लाखाला रेड्याची मागणी झाली. गतवर्षी ऐनापूर यात्रेमध्येदेखील 30 लाखांपर्यंत गजेंद्रला दर देण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. तासगाव येथील प्रदर्शनात सव्वा टन वजनाचा गजेंद्र मुख्य आकर्षण ठरला होता. यावेळी त्याला एका शेतकऱ्याने 61 लाखाला मागणी केली.
विलास नाईक यांनी सांगितले की, गजेंद्रला आम्ही रोज 10 लिटर दूध पाजतो, पेंड, चारा, डाळ, देतो. आम्ही तिघेजण त्याची देखभाल करतो. माझी दोन मुले व मी रोज त्याला आंघोळ घालून स्वच्छ करतो. आमच्या म्हशीपासूनच रेड्याचा जन्म झाला. आम्हाला गजेंद्रचे एवढे वजन होईल, असे वाटले नव्हते. 61 लाखाला मागणी होईल, असे वाटले नव्हते. मळ्यामध्ये गजेंद्रला पाहण्यासाठी परिसरातील व परगावाहून लोक येत आहेत. त्यामुळे खूप आनंद होत आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : रेड्याला तब्बल 61 लाखांची मागणी
रेडा ठरला आकर्षण; हा आहे 61 लाखांचा रेडा 'गजेंद्र';

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm