बेळगाव शहरात डंपरखाली सापडून महिला गंभीर जखमी;

बेळगाव शहरात डंपरखाली सापडून महिला गंभीर जखमी;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : दुचाकीवरुन जाताना दगडाने भरलेल्या डंपरने धडक दिल्यामुळे महिला गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील कोल्हापूर सर्कल येथे आज (बुधवार 24 फेब्रुवारी) दुपारी घडली. ॲक्टीव्हा चालक महिलेचा उजवा पाय पूर्णपणे निकामी झाला आहे. मेघा भिमराय मुख्यनावर (वय 28, रा. क्लब रोड, रेल्वे कॉटर्स) असे या महिलेचे नाव आहे. महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोल्हापूर सर्कल येथे सिग्नलच्या ठिकाणी मागून येणाऱ्या दगडाने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली सापडल्याने त्या महिलेचा उजवा पाय जांघेपासून पूर्णपणे तुटला असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. सदर अपघातात ॲक्टीव्हावरील त्यांच्या दोन्ही मुलांना (समर्थ आणि लक्ष्मी) सुदैवाने किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची नोंद वाहतूक उत्तर पोलीस स्थानकात झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरात डंपरखाली सापडून महिला गंभीर जखमी;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm