बेळगावच्या जिगरबाज युवकाने वाचविले तिचे प्राण

बेळगावच्या जिगरबाज युवकाने वाचविले तिचे प्राण

belgavkar.com | belgaum | belgavkar

तोच देवदूत म्हणून आला, आणि वाचविले प्राण

बेळगाव : साेशल मिडीयावर व्हायरल झालेल्या फोटोमुळे घटना खरी की खाेटी याची चर्चाही हाेऊ लागली होती. अखेर begavkar.com ने ही घटना खरी घडल्याची खात्री केली आहे. कोल्हापूर - सांगली रोडवरील पंचगंगा पुलावरून एका दहावीतील विद्यार्थीनीने नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयन केला. मात्र तिला बेळगावच्या जिगरबाज युवकाने शेकडो फूटावरून उडी टाकून वाचविले. राहुल दत्ता तिरोडकर (वय 21, रा. रामदेव गल्ली, वडगाव) असे त्या बेळगावच्या युवकाचे नाव आहे.
शहापूर, इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील एका शाळेतील दहावीतील विद्यार्थीनीने मंगळवारी (23 फेब्रुवारी) सायंकाळी 6 वाजता नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयन केला. त्या विद्यार्थीनीने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याची माहिती उपलब्ध होवू शकली नाही. विद्यार्थीनीने नदीत उडी मारल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ तेथील स्थानिक रहिवासी आणि पूलावरून जाणारे ते पाहतच बसले होते. याचवेळी बेळगावचा युवक काही कामानिमीत्त सांगलीला जात होता. यावेळी गर्दी पाहताना राहुलही थांबला.
घटना समजताच राहुलने क्षणाचाही विलंब न करता शेकडो फूटावरून नदीत उडी मारली. अंतर पाेहून तो तिच्यापर्यंत पाेहचला. तिला हळूहळू पाण्याच्या बाहेर काढले. त्यावेळी पूलावर जमलेल्या सर्व नागरीकांनी टाळ्या वाजविल्या. अन् अखेर बेळगावच्या युवकाने विद्यार्थीनीने प्राण वाचविले. दरम्यान घटनेचा फोटो सोशल मिडीयावर अवघ्या काही मिनीटांत माेठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यामुळे घटना खरी की खाेटी याची चर्चाही हाेऊ लागली. अखेर स्वतः राहुलने belgavkar.com ला ही घटना घडल्याचा दुजोरा दिला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावच्या जिगरबाज युवकाने वाचविले तिचे प्राण
तोच देवदूत म्हणून आला, आणि वाचविले प्राण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm