बेळगाव - खानापूर : चोर्ला येथील फॉल्स बघायला आलेल्या ग्रुपमधील एकाचा मृत्यू..

बेळगाव - खानापूर : चोर्ला येथील फॉल्स बघायला आलेल्या ग्रुपमधील एकाचा मृत्यू..

belgavkar.com | belgaum | belgavkar

चोर्ला येथे पर्यटनासाठी आलेल्या गोव्यातील तरूण - तरणीवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. इन्स्टाग्रामवर गोव्यातील दहा - बारा युवक युवतींनी एकत्र येऊन ग्रुप तयार केला. आणि गुगल मॅपवर कर्नाटकातील चोर्ला येथील हलतार (Haltara / हलतरा ) नदीवरचा फॉल्स पाहत असताना घनदाट जंगलात असलेल्या मधमाशांनी युवकांवर हल्ला चढविल्याने जीव वाचविण्याच्या नादात एक जण नदीत पडून ठार झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. ठार झालेल्या युवकाचे नाव कुमरजीत पाल (वय 21, रा. वास्को) असे असून तो मूळचा कोलकाता येथील आहे.
चोर्लापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या हलतार नदीवरील फॉल्स पाहण्यासाठी सदर ग्रुप दाखल झाले. सकाळी 11 वाजता हे सर्व युवक फॉल्सवर आनंद लुटत होते. तेवढ्यात जवळच झाडावर असलेल्या मधमाशांनी सर्व युवकांवर हल्ला चढविला. मधमाशांनी हल्ला चढविल्यामुळे घाबरून सर्वजण सैरावैरा पळू लागले. त्यात जीव वाचविण्यासाठी त्यांनी त्यांनी धावपळ केली. त्यात दोन तरूणी गंभीर जखमी झाल्या, तर कुमरजीत याने धबधब्यात उडी घेतल्याने तो पाण्यात बुडाल्याचे सांगण्यात आले. किंव्हा कुमरजित पाल हा मधमाशांच्या हल्ल्यात बेशुद्धावस्थेत तोल जाऊन धबधब्यात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा.
सदर घटना रविवारी सकाळी घडली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व युवक - युवती घाबरून वाहन पार्किंग केलेल्या ठिकाणी आले. मात्र एक युवक कमी असल्याचे दिसून आले. सोमवार 22 फेब्रुवारी रोजी वनखात्याचे कणकुंबी विभागाचे वनक्षेत्रपाल संतोष हुबळी यांच्यासह जांबोटी ओपीचे हवालदार बी. आय. कोनीन्नवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधमोहीम हाती घेतली. खानापूरचे पोलीस उपनिरीक्षक बसवराज पाटील यांनी पाणबुडी युवकांना पाचारण करून शोधमोहीम हाती घेतली. सायंकाळी 6 वा. मृतदेह हाती लागला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी खानापूरला हलविला. घटनेची माहिती मिळताच खानापूरचे पोलिस उपनिरीक्षक बसगौडा पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव - खानापूर : चोर्ला येथील फॉल्स बघायला आलेल्या ग्रुपमधील एकाचा मृत्यू..

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm