बेळगाव : कुत्र्यांकडून 10 बकऱ्यांचा फडशा;

बेळगाव : कुत्र्यांकडून 10 बकऱ्यांचा फडशा;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. निपाणी : खडकलाट येथील पोलिस ठाण्याजवळील माळभागात गावठी कुत्र्यांकडून बकऱ्यांचा कळपावर हल्ला झाला. यामध्ये 10 बकरी मृत झाली आहेत. त्यामुळे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. बुधवारी (17 फेब्रुवारी) रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत माहिती अशी, येथील पोलिस ठाण्याजवळील माळभागात परशुराम गोरडे, मल्लाप्पा गोरडे यांची घरे असून घरातल्या आवारातच बकऱ्यांचे कळप आहेत.
बकऱ्यांच्या सुरक्षेसाठी चारही बाजूंनी तारेच्या व दोरीच्या जाळीचे कंपाऊंड मारलेले आहे. दोघांचीही बकरी तारेच्या कंपाउंडमध्ये कळपात होती. बुधवारी रात्री कळपातील 10 बकरी कुत्र्याच्या हल्ल्यात मृत झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी कळपात जाऊन पाहिल्यावर परशुराम गोरडे यांची 7, मल्लाप्पा गोरडे यांची 3 बकरी मृत झाल्याचे आढळले. घटनेची माहिती येथील सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एम. के. माने यांना दिली. त्यांच्यासह वासू गावडे, ग्रा. पं. सदस्य गंगाराम पुजारी, माजी ग्रा. पं. सदस्य शंकर आवाडखान व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मृत बकऱ्यांचा पंचनामा केला.
डॉ. माने यांनी कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या बकऱ्यांमुळे दीड लाखांचे नुकसान झाले. तहसीलदारांना अहवाल देऊन नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. दोन्ही मेंढपाळांची परिस्थिती बेताची असून मेंढीपालनावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. त्यामुळे शासनातर्फे मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कुत्र्यांकडून 10 बकऱ्यांचा फडशा;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm