क्रिकेट खेळतानाच मैदानात कोसळला; खेळाडूचा जागीच मृत्यू

क्रिकेट खेळतानाच मैदानात कोसळला;
खेळाडूचा जागीच मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

पुणे : क्रिकेटच्या मैदानावर एक धक्कादायक आणि वाइट बातमी घडली आहे. एका सामन्यादरम्यान फलंदाजाचा मैदानावरच मृत्यू झाला. ही घटना पुण्यात सुरू असलेल्या एका स्पर्धेत घडली आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यात गुरुवारी ही घटना घडली. एका स्पर्धेत गुरुवारी दुपारी ओझर आणि जांबूत संघात सामना सुरू होता. तेव्हा फलंदाजीसाठी मैदानात असलेला महेश उर्फ बाबू नलावडे हे जागेवर कोसळले. त्यांना तातडीने डॉ. राऊत यांच्याकडे नेण्यात आले. पण तोपर्यंत मृत्यू झाला होता. नलावडे 47 वर्षांचे होते.

सामना सुरू असताना नॉन स्ट्रायकरवर उभे असलेले फलंदाज नलावडे धाव घेण्यासाठी पुढे आले. पण पुन्हा ते मागे आले आणि जमीनीवर बसण्याचा प्रयत्न केला पण ते खाली कोसळले. क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूचा मृत्यू होण्याची ही पहिली वेळ नाही.
गेल्या वर्षी ओडिसामधील केंद्रपाडा येथे 18 वर्षाच्या क्रिकेटपटूचा मृत्यू झाला होता. तेव्हा केंद्रपाडा जिल्ह्यातील कॉलेजमध्ये एका स्थानिक सामन्यात हृदयविकाराचा धक्का बसल्याने क्रिकेटपटूचा मृत्यू झाला. तर मुंबई देखील एका स्पर्धे दरम्यान संदीप चंद्रकांत म्हात्रेचा 36 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. फक्त स्थानिक नाही तर आंतरराष्ट्रीयस्तरावर देखील अशा काही घटना घडल्या आहेत. ज्यात खेळाडूंच्या डोक्याला चेंडू लागल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

क्रिकेट खेळतानाच मैदानात कोसळला; खेळाडूचा जागीच मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm